ICC World Test Championship Points Table: ऐतिहासिक विजयानंतर टीम इंडियाने पटकावले अव्वल स्थान, ऑस्ट्रेलियाची तिसऱ्या स्थानी घसरण
भारत-ऑस्ट्रेलिया टेस्ट 2021 (Photo Credit: PTI)

ICC World Test Championship Points Table: ऑस्ट्रेलियाविरुद्ध (Australia) ब्रिस्बेनच्या (Brisbane) गब्बा येथे टीम इंडियाच्या ऐतिकासिक विजयानंतर आयसीसी टेस्ट चॅम्पियनशिपच्या (Test Championship) गुणतालिकेत मोठे बदल झाले आहेत. रिषभ पंतच्या नाबाद 89, शुभमन गिलचे 91 आणि चेतेश्वर पुजाराच्या 56 धावांच्या जोरावर भारताने कांगारू संघाला धूळ चारली आणि सलग दुसऱ्यांदा बॉर्डर-गावस्कर (Border-Gavaskar Trophy) मालिकेवर आपले नाव करेल. अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात संघाने 2-1 असा विजय मिळवला आणि 1988 पासून गब्बाच्या मैदानावर यजमान संघाचे अधिराज्य संपुष्टात आणले. 328 धावांचा पाठलाग करताना टीम इंडियाने 116व्या ओव्हरमध्ये विजयीरेष ओलांडली. या महत्त्वपूर्ण विजयानंतर भारताने टेस्ट चॅम्पियनशिपच्या (India Test Championship) गुणतालिकेत झेप घेत अव्वल स्थान पटकावले तर ऑस्ट्रेलियाला तिसऱ्या स्थानावर ढकलले. आयसीसीकडून (ICC) टक्केवारीची नियम सुरू झाल्यापासून टीम इंडियाने पहिल्यांदा पॉईंट्स टेबलमध्ये मनाचे स्थान मिळवले आहे. (Team India च्या Australia मध्ये टेस्ट सीरीजमधील ऐतिहासिक कामगिरीनंतर PM Narendra Modi ते Sachin Tendulkar यांच्याकडून कौतुकाचा वर्षाव)

भारतीय संघाने विजयसह 30 गुणांची कमाई केली ज्यामुळे त्यांचे एकूण गुण 430 असे आहेत. दुसरीकडे ऑस्ट्रेलिया भारत आणि न्यूझीलंडच्या मागे तिसर्‍या स्थानावर घसरला आहे. इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका टॉप-5 संघात आहेत. दरम्यान, ऑस्ट्रेलियाच्या पराभवाचा मोठा फायदा किवी संघाला झाला. वेस्ट इंडिज आणि पाकिस्तानविरुद्ध टेस्ट सिरीजमध्ये क्लीन-स्वीप करत टेस्ट चॅम्पियनशिपच्या दुसऱ्या स्थानासाठी किवी संघ दावेदार बनला होता. टीम इंडियाच्या विजयाची एकूण टक्केवारी 71.1 असून किवी संघाची 70 आणि कांगारू संघाची विजयाची टक्केवारी 69.2 अशी आहे. दुसरीकडे, टीम इंडिया आता मायदेशात होणाऱ्या इंग्लंडविरुद्ध 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी तयारीला लागेल. सध्या श्रीलंका दौऱ्यावर असलेला इंग्लंड संघ आणि टीम इंडिया यांच्यात 5 फेब्रुवारीपासून कसोटी मालिका खेळली जाणार आहे.

भारत आणि इंग्लंड दरम्यानची मालिका देखील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा एक भाग असेल. एकीकडे टीम इंडिया आपले पहिले स्थान मजबूत करू इच्छित असेल तर इंग्लंड संघ पहिल्या दोन स्थान पटकावण्याच्या निर्धारित असेल. यापूर्वी इंग्लंडने श्रीलंकाविरुद्ध दोन सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना जिंकला असून आता दुसरा सामन्यात विजय मिळवत आपला विजयी प्रवास सुरूच ठेवण्याच्या निर्धारित असतील.