टीम इंडिया (Photo Credit: Twitter/BCCI)

ICC World Test Championship: टीम इंडियाने (Team India) इंग्लंडविरुद्ध (England) दुसऱ्या कसोटी सामन्यात 317 धावांनी शानदार विजय मिळवला आहे. यजमान भारतीय संघाने (Indian Team) विजयासाठी दिलेल्या 482 धावांच्या आव्हानाच्या प्रत्युत्तरात इंग्लंड टीम इंडियाच्या भेदक माऱ्यासमोर दुसऱ्या डावात अवघ्या 164 धावांवर ऑलआऊट झाला. भारतीय संघाला इंग्लिश टीमविरुद्ध या विजयाचा मोठा फायदा झाला आणि त्यांनी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत (World Test Championship Points Table) दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. पहिल्या चेन्नई टेस्ट सामन्यातील पराभवानंतर यजमान संघाची चौथ्या स्थानी घसरण झाली होती, मात्र त्याच खेळपट्टीवर जबरदस्त कमबॅक करत इंग्लिश टीमचा दुसऱ्या सामन्यात सफाया केला. दुसरीकडे, इंग्लंड पराभवामुळे आता टेस्ट चॅम्पियनशिपच्या चौथ्या स्थानी घसरला आहे. दुसऱ्या चेपॉक टेस्टच्या चौथ्या दिवशी अक्षर पटेलने भारताच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. (IND vs ENG 2nd Test: 'हे' 5 खेळाडू ठरले भारताच्या विजयाचे शिल्पकार, इंग्लंडविरुद्ध केली कौतुकास्पद कामगिरी)

न्यूझीलंडने यापूर्वीच फायनलमध्ये प्रवेश केला आहे, तर भारत, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया संघात दुसऱ्या संघासाठी लढत पाहायला मिळत आहे. गुणतालिकेत टीम इंडिया आता न्यूझीलंडच्या 0.3 टक्के गुण मागे आहे. भारताचे गुणतालिकेत 460 गुण आहेत तर PCT 69.7 आहे. भारताला न्यूझीलंडनंतर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलची पात्रता मिळवण्यासाठीसध्या सुरू असलेल्या कसोटी मालिकेतील उर्वरित दोन सामन्यांपैकी आणखी एक सामना जिंकण्याची गरज आहे. आयसीसी शोपीस स्पर्धेचा अंतिम सामना यंदा वर्षाच्या शेवटी इंग्लंडचाय प्रसिद्ध लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर खेळला जाणार आहे. अश्विन आणि रोहितव्यतिरिक्त पदार्पण पदार्पणवीर अक्षर पटेलने पहिल्या कसोटी सामन्यात चमकदार कामगिरी केली आणि पहिल्यांदा पाच विकेट घेतल्या. शिवाय, इंग्लंडच्या दुसर्‍या डावात त्याने पहिले अर्धशतक झळकावले. चौथ्या दिवसाच्या दुसऱ्या सत्रात अक्षरने इंग्लंड कर्णधार जो रूटला 92 चेंडूत 33 धावांवर माघारी पाठवलं आणि कसोटी सामना वाचण्याची शक्यता कमी केली.

त्यानंतर अष्टपैलू मोईन अलीने शेवटच्या विकेटसाठी स्टुअर्ट ब्रॉडसह 38 धावांची वेगवान भागीदारी रचली, मात्र कुलदीप यादवने फिरकीपटूला बाद करत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केला. मोईनने 18 चेंडूत 43 धावांमध्ये तीन चौकार आणि पाच षटकार लगावले. या विजयासह भारताने आता चार सामन्यांची मालिका 1-1 अशी बरोबरीत आणली आहे. मालिकेचे उर्वरित दोन सामने अहमदाबादमधील सुधारित मोटेरा स्टेडियमवर खेळले जातील.