ICC World Test Championship 2021: भारत (India) आणि न्यूझीलंड (New Zealand) संघांमधील आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनल (ICC WTC Final) सामन्याला आता फक्त काही दिवस शिल्लक राहिले आहेत. 18 जून रोजी दोन्ही कसोटी संघ साउथॅम्प्टनच्या (Southampton) एजस बाउल (Ageas Bowl) स्टेडियमवर टेस्ट चॅम्पियनशिपच्या पहिल्या विजेतेपदाच्या शोधात आमनेसामने येतील. कोविड-19 च्या भारतात वाढत्या प्रकरणांमुळे आयपीएलचा 2021 हंगाम अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आला आहे. त्यामुळे आता सर्व क्रिकेटप्रेमींना टेस्ट चॅम्पियनशिपचे वेध लागले आहे. फलंदाजांप्रमाणेच गोलंदाजांच्या खांद्यावर देखील संघाला विजय मिळवून देण्याचे भार असेल. विशेष म्हणजे दोन्ही संघातील एकूण तीन आयसीसी टेस्ट क्रमवारीत टॉप-10 मध्ये असून आगामी फायनलमध्ये धुमाकूळ घालण्यासाठी उत्सुक असतील. (ICC World Test Championship Final 2021: न्यूझीलंड विरोधात WTC फायनल सामन्यात टीम इंडिया ‘या’ 11 धुरंधरांना मैदानात उतरवणार, पहा संभावित प्लेइंग XI)
आर अश्विन (R Ashwin)
रविचंद्रन अश्विन सध्या भारतीय कसोटी संघाचा आघाडीचा फिरकीपटू असून टीम इंडियासाठी त्याचे प्रदर्शन महत्वपूर्ण ठरणार आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर इंग्लंडविरुद्ध घरेलू मालिकेत अश्विनने बॉलसोबतच बॅटने देखील शानदार कामगिरी केली. अश्विन सध्या 850 गुणांसह अश्विनने सध्या कसोटी क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर आहे. त्यामुळे, न्यूझीलंडच्या वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या विजेतेपदाच्या मार्गात तो एक प्रमुख अडथळा सिद्ध होऊ शकतो.
नील वॅग्नर (Neil Wagner)
35 वर्षीय वॅग्नर न्यूझीलंड कसोटी संघाचा स्पेशलिस्ट म्हणून ओळखला जातो. वॅग्नरने 51 कसोटी सामन्यात 219 विकेट्स घेतल्या असून तो सध्या आयसीसी टेस्ट गोलंदाजांच्या रँकिंगमध्ये 825 गुणांसह अश्विनच्या मागे तिसऱ्या क्रमांकावर आहे. शिवाय, वॅग्नरने भारताविरुद्ध 5 कसोटी मालिकेत 18 विकेट्स घेतल्या आहेत त्यामुळे पुन्हा एकदा तो भारतीय फलंदाजांना अडचणीत टाकण्यासाठी प्रयत्नशील असेल.
टिम साउथी (Tim Southee)
टीम साउथी आयसीसी कसोटी क्रमवारीत 811 गुणांसह सहाव्या क्रमांकावर आहे. साउथीने 77 टेस्ट सामन्यात आजवर एकूण 302 विकेट्स घेतल्या असून भारताविरुद्ध 39 विकेट्सचा यात समावेश आहे. शिवाय, साउथीचा टीम इंडिया कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) विरोधात रेकॉर्ड देखील उत्तम आहे. किवी संघाच्या या वेगवान गोलंदाजाने विराटला कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक 10 वेळा पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला आहे. त्यामुळे, टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात विराट सोबत भारतीय संघाला लोळवण्यासाठी तो उत्सुक असेल.