India vs New Zealand: आयसीसी पुरुष विश्वचषक 2023 (ICC World Cup 2023 Semi-Final) साठीचा उपांत्यफेरी सामना आज (15 नोव्हेंबर) भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यात पार पडत आहे. मुंबई येथील वानखेडे स्टेडीयमवर पार पडणाऱ्या या ऐतिहासिक सामन्यासाठी काऊंटडाऊन सुरु झाले आहे. दुपारी दोन वाजलेपासून हा सामना सुरु होणार आहे. दरम्यान, या सामन्याकडे क्रिकेटप्रेमी आणि क्रीडा रसिकांचे लक्ष लागून राहिले असतानाच मुंबई पोलीस सतर्क आहेत. मुंबईचे सहपोलीस आयुक्त सत्यनाराणय चौधरी यांनी सांगितले की, विश्वचषक सामन्यासाठी चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. वाहतूक पोलिसांनीही योग्य ती दक्षता घेतली असून, सुरक्षा व्यवस्थेत कोणतीही कमी राहणार नाही याकडे लक्ष दिले जात आहे.
पोलीस सहआयुक्तांनी सांगिले की, आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना आणि त्यातही विश्वचषकासाठी लढत होत असल्याने अवघ्या जगाचे लक्ष मुंबईकडे लागले आहे. देश आणि जगभरातून क्रीडाप्रेमी मुंबईत दाखल होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर सुरक्षेबाबत सर्व काळजी घेण्यात आली आहे. कोणताही संभाव्य धोका टाळण्यासाठी जवळपास 700 कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. वाहतुकीचे व्यवस्थापनही चांगल्या प्रकारे करण्यात आले आहे. त्यासाठी विशेष बदल आणि उपाययोजनाही करण्यात आल्या आहेत. दहशतवाद विरोधी पथकही तैनात करण्यात आले आहे. संशयास्पद गोष्टींवर नजर ठेवली जात आहे. वाहनांचीही योग्य प्रकारे झडती घेतली जात आहे. (हेही वाचा, World Cup 2023: मुंबईमध्ये वानखेडे स्टेडीयमवर विश्वचषक सामन्याचा थरार; भारत आणि न्यूझीलंड आमने-सामने)
भारती संघातील खेळाडू:
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (आठवता), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज
न्युझीलँड संघातील खेळाडू:
डेव्हॉन कॉन्वे, रचिन रवींद्र, केन विल्यमसन (कर्णधार), डॅरिल मिशेल, टॉम लॅथम (सप्ताह), ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, मिचेल सँटनर, टिम साउथी, लॉकी फर्ग्युसन, ट्रेंट बोल्ट
व्हिडिओ
#WATCH | #INDvsNZ: Maharashtra | Satyanarayan Chaudhary, Joint Commissioner of Police, Law & Order, Mumbai says, "All security arrangements have been done. We have deployed around 700 personnel. We have also done proper exercise with the traffic police. We have planned the… pic.twitter.com/ZwRP5qSQYN
— ANI (@ANI) November 15, 2023
दरम्यान, मुंबईचे एकूण हवामना पाहता वानखेडे स्टेडियमची खेळपट्टी संतुलित आहे आणि संपूर्ण सामन्यात ती तशीच राहण्याची शक्यता आहे. आजचे हवामना पाहता वानखेडे स्टेडियमचे तापमान 49 टक्के आर्द्रतेसह 28 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. या स्टेडियमवरील शेवटच्या 10 सामन्यांमध्ये पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या 318 आहे. आजवरचा सरासरी अनुभव पाहता नाणेफेक जिंकणारा संघ शक्यतो प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतो. असा निर्णय घेणाऱ्या संघाने आतापर्यंत जवळपास एकूण सामन्यांपैकी 60% सामने जिंकले आहेत.