ICC World Cup 2019: BAN vs AFG सामन्यातील नायक शाकिब अल हसन ने भारत मॅचबद्दल केले हे विधान, टीम इंडिया ची चिंता वाढण्याची शक्यता
(Image Credit: AP/PTI Photo)

शाकिब अल हसन (Shakib Al Hasan) च्या हंटपैलू खेळीच्या जोरावर बांगलादेश (Bangladesh) ने अफगाणिस्तान (Afghanistan) संघावर दणदणीत विजय मिळवत विश्वकपमध्ये सेमीफायनल साठी आपली दावेदारी कायम ठेवली आहे. बांगलादेश चा पुढील सामना अपराजित भारताशी 27 जुलै ला ओल्ड ट्रॅफर्ड (Old Trafford) मैदानात खेळाला जाईल. भारत (India) विरुद्ध हा सामना बांगलादेशसाठी अत्यंत महत्वाचा आहे. या आगामी मॅचबद्दल बोलताना शाकिब म्हणाला, 'भारत एक मजबूत संघ आहे, परंतु आम्ही त्यांच्याविरुद्ध सर्वोत्तम कामगिरी करू.' (रोहित शर्मा ने साथिदारांसोबत इंग्लंडमध्ये 5 तासांच्या प्रवासादरम्यान मांडला 'डम शराज'चा डाव Video)

शाकिब म्हणाला की भारतमध्ये अशा अनेक खेळाडू आहेत जे स्वत: च्या जोरावर टीम ला विजय मिळवून देऊ शकतात, परंतु बांगलादेशमध्ये मॅच जिंकण्याची क्षमता आहे.

'आमचा पुढचा सामना भारताच्या मजबूत संघाशी असेल जो सध्या गुणतालिकेत शीर्षस्थानी आहे. त्याची दृष्टी हा विश्वकप जिंकण्यावर आहे. आमच्यासाठी हा सामना खूप कठीण असेल, पण अनुभव आम्हाला मदत करेल. स्पर्धेत आपली आशा जिवंत ठेवण्यासाठी, आम्ही सर्व परीने प्रयत्न करू.

अफगाणिस्तान ला 62 धावांनी नामावल्यावर बांगलादेशी संघाचा उत्साहाव उंचावला आहे. 7 सामन्यात त्यांचे 7 गुण आहे आणि यजमान इंग्लंड (England) च्या चौथ्या क्रमांकाच्या 1 गुण मागे आहे. भारतविरुद्ध विजय मिळवल्यास बांगलादेश सेमीफायनलच्या जवळ पोहचू शकतो. बांगलादेशचा सध्या गुणतालिकेत 7 गुणांसह 5 व्या स्थानावर आहे. त्यामुळे त्यांना सेमीफायनल गाठण्याची संधी आहे. दुसरीकडे भारताचा संघ 9 गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. भारताचा पुढील सामना गुरुवारी वेस्ट इंडिज विरोधात होणार आहे.