ICC World Cup 2019: 'सुपर फॅन' ला दिलेला शब्द विराट कोहली ने दोन दिवसात पाळला! चारुलता पटेल साठी केली तिकिटांची व्यवस्था
(Photo Credit: Instagram)

आपल्या चाहत्यांची मनं कशी जिंकायची आहे हे भारताचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) कडून शिकावे. नुकताच झालेला बांग्लादेश (Bangladesh) सामना पाहण्यासाठी चारुलता पटेल (Charulata Patel) या 87 वर्षीय आजीबाईंनी हजेरी लावली आणि सर्वांचे लक्ष वेधून घेतले. भारताने हा सामना जिंकल्यानंतर कोहली आणि टीम इंडियाचा उपकर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) यांनी पटेल यांची भेट घेत त्यांचे आशीर्वाद घेतले. चारुलता यांनीही दोघांना भरभरुन आशीर्वाद दिला. त्यावेळी विराटने चारुलता यांना पुढच्या सामन्यांमध्येही आम्ही तुम्हाला प्रेक्षक गॅलरीत पाहू इच्छितो, अशी इच्छा व्यक्त केली. त्यावर चारुलता पटेल यांनी माझ्याकडे तिकीट नाही, त्यामुळे पुढच्या सामन्यांमध्ये मी येऊ शकणार नाही असं सांगितलं. कोहलीने त्यांची अडचण समजून, मी तुम्हाला पुढची सर्व तिकीटं देईन असं आश्वासन दिलं. (ICC World Cup 2019: IND vs BAN मॅचमध्ये अंपायरशी हुज्जत विराट कोहली ला पाडणार महागात, सामनाबंदीची होऊ शकते कारवाई)

आणि आता, काही तासातच कोहलीने आपले वाचन पळत चारुलता यांना भारताच्या आगामी सामन्याच्या तिकिटांची व्यवस्था केली आहे. नुकतेच टाईम्स ऑफ इंडिया ने चारुलता यांच्या नातीशी फोनवरुन बातचीत केली. त्या म्हणाल्या, “विराट आणि रोहितने मंगळवारी आजीची भेट घेत, पाया पडून आशीर्वाद घेतले. त्यावेळी विराटने आगामी सर्व मॅचसाठी उपस्थित राहण्याची विनंती केली. मात्र आजीने तिकीटं नसल्याचं सांगताच, विराटने काळजी करु नका मी तिकिटाची व्यवस्था करेन असं सांगितलं. विराटने दिलेला शब्द दोन दिवसात पाळला आणि आमच्यासाठी भारताच्या सर्व सामन्यांची तिकीटं पाठवली आहेत. 6 जुलैला लीड्स (Leeds) मध्ये होणारा श्रीलंका (Sri Lanka) विरुद्ध सामना, दोन्ही सेमीफायनल आणि फायनलचं तिकीट आम्हाला मिळालय”.

बांग्लादेशविरुद्ध सामन्यात चारुलता आज्जीनी फुल टू धमाल केल्याचे पाहायला मिळाले. चारुलता यांचे सामन्यातील व्हिडीओ चांगलेच व्हायरल झालेले पाहायला मिळत आहेत.