(Photo Credit: ICC Twitter)

भारतीय संघ विश्वकपमधला एकमेव अपराजित संघ आहे. सध्या भारतीय संघातील सर्वच खेळाडू चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. मॅन्चेस्टर (Manchester) मध्ये वेस्ट इंडिज (West Indies) विरुद्ध सामन्यात जरी भारताची आघाडीची फळी कमकुवत ठरली असली तरी अष्टपैलू हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आणि एम एस धोनी (MS Dhoni) यांनी सहाव्या विकेटसाठी 70 धावांची भागिदारी करत भारताचा डाव सांभाळला. मात्र, पाकिस्तान (Pakistan) चा एक माजी दिग्गज खेळाडू पांड्याच्या या खेळीवर नाखूश आहे. पाकिस्तानचा दिग्गज खेळाडू अब्दुल रज्जाक (Abdul Razzaq) यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात त्याने हार्दिकच्या फलंदाजी बद्दल भाष्य केले आहेत आणि बीसीसीआय (BCCI) कडे एक काम मागितले आहे. ते म्हणजे हार्दिकचा प्रशिक्षक बनण्याचं. (ICC World Cup 2019: वेस्ट इंडिज मॅचमध्ये भारताच्या विजयाने सेमीफायनलची समीकरणे बदलली, पाकिस्तान खुश; जाणून घ्या काय आहे स्थती)

पाकिस्तान पत्रकार साज सादिक (Saj Sadiq) ने हा व्हिडिओ आपापल्या ट्विटर अकाउंट वर शेअर केला आणि सध्या तो व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये रज्जाकनं, "मला फक्त दोन आठवडे द्या, मी त्याला जगातला सर्वात चांगला ऑल राऊंडर बनवतो", असे सांगितले आहे.

पुढे रज्जाकने हार्दिकला त्याची खेळी सुधारवण्याची गरज आहे असे मत व्यक्त केले. तसेच, जेव्हा तो फलंदाजी करतो तेव्हा त्याची फुट मुव्हमेंट आणि पायाची गती चूकीची आहे. रज्जाक ने पुढे बीसीसीआय कडे दोन आठवडे मागितले आहे हार्दिकला जगातील सर्वात मोठा ऑलराऊंडर बनवण्यासाठी.

दरम्यान, वेस्ट इंडिजविरुद्ध मॅचमध्ये विराट कोहली (Virat Kohli) ने टॉस जिंकून पहिले फलंदाजी चा निर्णय घेतला. टीम इंडियाची सुरुवात चांगली झाली नाही. रोहित शर्मा (Rohit Sharma) च्या रूपात भारताला पहिला धक्का लागला. यानंतर विराट आणि के एल राहुल (KL Rahul) ने टीम इंडियाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण राहुल राहुल 64 चेंडूत 48 धावा करत माघारी परतला. कोहली आणि धोनी यांच्या अर्धशतकी खेळीमुळे वेस्ट इंडिजविरुद्ध टीम इंडियाने 268 रन केले आहेत. एम.एस धोनीने 61 बॉलमध्ये नाबाद 56 रन केले, यामध्ये 3 चौकार आणि 2 षटकारांचा  समावेश होता.