(Photo Credit: Twitter)

अफगाणिस्तान (Afghanistan) विरुद्ध भारताच्या खराब फलंदाजीने पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित केला की, भारतीय संघात चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करणार कोण? तज्ञांच म्हणणं आहे की ऋषभ पंत (Rishabh Pant) याला संधी दिली पाहिजे, परंतु माजी कर्णधार अंशुमन गायकवाड (Anshuman Gaekwad) असं मानत नाही. आयएनएस (IANS) शी बोलताना गायकवाड म्हणाले, केदार जाधव (Kedar Jadhav) एक चांगला क्रिकेटपटू आहे, तो व्यस्त खेळाडू आहे आणि स्ट्राईक ही बदलू शकतो, त्याच्यात मोठे शॉट खेळण्याची क्षमता आहे आणि मला वाटते की त्याने 4 व्या क्रमांकावर फलंदाजी करावी. (IND vs WI, CWC 2019: हे 3 वेस्ट इंडिज खेळाडू ठरतील घातक, आपल्या खेळी ने बदलू शकतात संपूर्ण मॅच)

गायकवाड म्हणाले, "एक दुसरा पर्याय म्हणजे दिनेश कार्तिक (Dinesh Karthik). कार्तिक एक अनुभवी आणि सुप्रसिद्ध फिनिशर आहे. तो क्रीजवर जास्त वेळ राहिला आहे आणि जेव्हा भारतीय संघ अडचणीत असतो तेव्हा तो खूप महत्वाचा असतो. आपल्याला अशा खेळाडू ची गरज आहे जो कोहली ला साथ देऊन त्याच्या बरोबर टिकून खेळेल.'

रिषभ पंत (Rishabh Pant) बद्दल बोलताना गायकवाड म्हणाले, 'तो माझ्यासाठी नंबर 4 चा फलंदाज नाही. तो चेंडू चांगल्या प्रकारे मारतो, परंतु त्या क्रमांकावर तुम्हाला असा खेळाडू हवा जो की खेळपट्टी वर टिकून खेळेल. मला वाटत नाही की मी या ठिकाणी पंत ला खेळायला देईन."

भारताचा पुढील सामना वेस्ट इंडिज (West Indies) संघाशी ओल्ड ट्रॅफर्ड (Old Trafford) वर खेळाला जाईल. 6 सामन्यातील 5 पराभवामुळे वेस्ट इंडिज चे विश्वकप मधील आव्हान संपुष्टात आले आहे. दुरीकडे, भारताने हा सामना जिंकल्यास ते सेमीफायनलमध्ये आपले स्थान निश्चित करण्यास अजून एक पाऊल जवळ जाईल. भारतीय संघाने आपले 5 पैकी 4 सामने जिंकून गुणतालिकेत तिसरे स्थान मिळवले आहे.