ICC Test Rankings: ने (ICC) कसोटीतील फलंदाजांची ताजी क्रमवारी जाहीर केली आहे. आयसीसीच्या ताज्या क्रमवारीत विराट कोहली टॉप-20 मधून बाहेर पडला आहे. बाबर आझम याचेही मोठे नुकसान झाले आहे. विराट कोहली सध्या फलंदाजांच्या ICC कसोटी क्रमवारीत 22 व्या स्थानावर पोहोचला आहे. ताज्या क्रमवारीत भारतीय कर्णधार रोहित शर्मा 26 व्या क्रमांकावर आहे.
तब्बल 10 वर्षांनंतर विराट कोहली आयसीसी कसोटी क्रमवारीत टॉप-20 मधून बाहेर पडला आहे. यापूर्वी डिसेंबर 2014 मध्ये त्याला टॉप-20 फलंदाजांमध्ये स्थान मिळाले नव्हते. त्यानंतर सलग 10 वर्षे विराटचा दबदबा कायम राहिला, मात्र गेल्या दोन वर्षांपासून त्याची बॅट शांत आहे आणि तो क्रमवारीत सातत्याने मागे पडत आहे. (हेही वाचा - IND vs SA T20I Series 2024: टी-20 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 'या' पाच भारतीय गोलंदाजांनी घेतल्या आहे सर्वाधिक विकेट, यादीत 'हा' खेळाडू अव्वल )
ताज्या क्रमवारीत पाकिस्तानच्या बाबर आझमचेही मोठे नुकसान झाले आहे. बाबर आझमची सध्या 17व्या स्थानावर घसरण झाली आहे. बाबरची बॅटही गेल्या वर्षभरापासून शांत आहे. याच कारणामुळे त्याला पाकिस्तानच्या कसोटी संघातूनही वगळण्यात आले होते. बाबर आझमला कसोटीच्या शेवटच्या 18 डावात एकही अर्धशतक झळकावता आलेले नाही.
जो रूट पहिल्या क्रमांकावर कायम आहे
आयसीसीच्या ताज्या क्रमवारीत इंग्लंडचा जो रूट पहिल्या क्रमांकावर कायम आहे. त्याचे 903 गुण आहेत. न्यूझीलंडचा केन विल्यमसन दुसऱ्या तर इंग्लंडचा हॅरी ब्रूक तिसऱ्या स्थानावर आहे. भारताची युवा सलामीवीर यशस्वी जैस्वाल ७७७ गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. यानंतर ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ पाचव्या क्रमांकावर आहे. त्याचे 757 गुण आहेत.
टॉप-10 मध्ये दोन भारतीयांचा समावेश
ICC कसोटी क्रमवारीत फलंदाजांच्या टॉप-10 मध्ये दोन भारतीय फलंदाजांचा समावेश आहे. युवा सलामीवीर यशस्वी जैस्वाल चौथ्या क्रमांकावर आहे. तर यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत सहाव्या क्रमांकावर आहे. पंतचे 750 गुण आहेत. न्यूझीलंडचा डॅरिल मिशेल सातव्या क्रमांकावर, ऑस्ट्रेलियाचा उस्मान ख्वाजा आठव्या क्रमांकावर, पाकिस्तानचा सौद शकील नवव्या क्रमांकावर आणि ऑस्ट्रेलियाचा मार्नस लाबुशेन दहाव्या क्रमांकावर आहे.