ICC Annual Rankings: T20 क्रमवारीत टीम इंडियाचा दबदबा, जाणून घ्या काय आहे वनडे आणि टेस्ट रँकिंगमध्ये संघाची स्थिती
टीम इंडिया (Photo Credit: PTI)

ICC Annual Rankings: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (International Cricket Council) बुधवार, 3 मे रोजी वार्षिक अद्यतन जारी केलीय ज्यामध्ये टीम इंडियाचे ICC पुरुष टी-20 क्रमवारीत त्यांचे नंबर 1 स्थान अबाधित राहिले आहे. भारताने दुसऱ्या स्थानावर असलेल्या इंग्लंडवर (England) आपली आघाडी एका गुणाने वाढवली आणि आता दोन्ही संघात 5 गुणांचा फरक आहे. घरच्या मैदानावरील सातत्यपूर्ण प्रभावी कामगिरीमुळे संघाचे क्रमवारीत आघाडी मिळवली आहे. गेल्या वर्षी टी-20 विश्वचषकात भारतीय संघाने (Indian Team) निराशाजनक खेळी केली होती, ज्यामध्ये 2012 नंतर प्रथमच संघ आयसीसी स्पर्धेच्या बाद फेरीत पोहोचण्यात अपयशी ठरले. तथापि, त्यानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वात संघाने सर्वात लहान फॉरमॅटमध्ये चांगले प्रदर्श केले आहेत. पण कसोटीत टीम इंडिया (Team India) अव्वल क्रमांकावर असलेल्या ऑस्ट्रेलियापेक्षा नऊ गुणांनी पिछाडीवर आहेत. तसेच वार्षिक क्रमवारीनुसार एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये न्यूझीलंड जगातील नंबर वन संघ आहे. (ICC T20 Rankings: टी-20 क्रमवारीत पाकिस्तान खेळाडूंचा दबदबा, टॉप-10 मध्ये KL Rahul एकमेव भारतीय; पहा ताजी रँकिंग)

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली, भारताने T20I क्रिकेटमध्ये न्यूझीलंड, वेस्ट इंडिज आणि श्रीलंकेचा मायदेशात 9-0 असा पराभव केला आहे. आयपीएल 2022 च्या समाप्तीनंतर जूनमध्ये माजी विश्वविजेते 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेत दक्षिण आफ्रिकेशी भिडतील. याशिवाय इंग्लंड 265 रेटिंग गुणांसह दुसऱ्या स्थानावर आणि 261 रेटिंग गुणांसह पाकिस्तान पहिल्या तीनमध्ये आहे. चौथ्या क्रमांकावर असलेल्या दक्षिण आफ्रिकेने त्यांचे जुने रेटिंग गुण (253) कायम राखत एका स्थानाची झेप घेतली आहे, तर ऑस्ट्रेलियानेही गुणतालिकेत पाचव्या स्थानावर आहे. दरम्यान, आयसीसी कसोटी क्रमवारीत ऑस्ट्रेलियाचे अव्वल स्थान कायम आहे. पॅट कमिन्सच्या संघाने या वर्षाच्या सुरुवातीला अ‍ॅशेस मालिकेत इंग्लंडला 4-0 अशी धूळ चारली. त्यानंतर पाकिस्तानमध्ये 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-0 असा ऐतिहासिक विजय मिळवला. ऑस्ट्रेलिया आता 128 गुणांच्या रेटिंगसह दुसऱ्या स्थानावर असलेल्या भारतापेक्षा नऊ गुणांनी आघाडीवर आहे.

दुसरीकडे, आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत भारत चौथ्या स्थानावर कायम आहे, तर 2019 विश्वचषक स्पर्धेचे उपविजेते न्यूझीलंड नंबर 1 च्या सिंहासनावर विराजमान आहेत. लक्षणीय आहे की न्यूझीलंडने वनडे क्रमवर्ती अव्वल स्थान काबीज केले सलते तरी दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या इंग्लंडवरील त्यांची आघाडी तीन ऐवजी एका गुणाने कमी झाली आहे. तसेच इंग्लंड आणि तिसऱ्या क्रमांकावरील ऑस्ट्रेलिया यांच्यातील गुणांचा फरक सात वरून 17 वर पोहोचला आहे. एकदिवसीय क्रमवारीत भारत (105 गुण) चौथ्या स्थानावर असून ऑस्ट्रेलियापेक्षा केवळ दोन गुणांनी (107) मागे आहे.