World Cup 2023 Warm Up matches: भारतात होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेची (ODI World Cup 2023) तयारी पूर्ण झाली आहे. या विश्वचषकापूर्वी सर्व संघ सराव सामने खेळणार आहेत. त्याचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. इंग्लंड आणि नेदरलँड्सविरुद्धच्या सराव सामन्यांमध्ये टीम इंडिया (Team India) आपली ताकद दाखवेल. विश्वचषक स्पर्धेतील सर्व दहा संघ 2-2 सराव सामने खेळतील. वेळापत्रकानुसार सराव सामने 29 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबर या कालावधीत होणार आहेत. ज्यामध्ये सर्व संघ आपले 15 खेळाडू उतरवू शकतील. (हे देखील वाचा: ICC Men’s Cricket World Cup 2023: विश्वचषक 2023 साठी BookMyShow वर बुक करता येणार तिकिटे; जाणून घ्या कधी होणार उपलब्ध)
टीम इंडिया कोणत्या संघांशी भिडणार?
टीम इंडिया सराव सामन्यात इंग्लंड आणि नेदरलँड्सशी भिडणार आहे. भारतीय संघ आपला पहिला सामना 30 सप्टेंबर रोजी गुवाहाटी येथे खेळणार आहे. ज्यामध्ये गतविजेता विश्वविजेता संघ इंग्लंड समोर असेल. दुसरीकडे, 3 ऑक्टोबरला भारताची स्पर्धा नेदरलँडशी होणार आहे. सराव सामने दुपारी 2 वाजता सुरू होतील.
2023 World Cup Warm Up matches.
India will be playing the Netherlands and England. pic.twitter.com/Hp8YHuY86Q
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) August 23, 2023
या शहरांमध्ये सराव सामने खेळवले जातील
1. गुवाहाटी
2. हैदराबाद
3. तिरुवनंतपुरम
विश्वचषक 2023 सराव सामन्यांचे वेळापत्रक
29 सप्टेंबर
- बांगलादेश विरुद्ध श्रीलंका, बारसापारा क्रिकेट स्टेडियम, गुवाहाटी
- दक्षिण आफ्रिका विरुद्ध अफगाणिस्तान, ग्रीनफिल्ड इंटरनॅशनल स्टेडियम, तिरुवनंतपुरम
- न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान, राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियम, हैदराबाद
30 सप्टेंबर
- भारत विरुद्ध इंग्लंड, बारसापारा क्रिकेट स्टेडियम (गुवाहाटी)
- ऑस्ट्रेलिया विरुद्ध नेदरलँड्स, ग्रीनफिल्ड इंटरनॅशनल स्टेडियम (तिरुवनंतपुरम)
2 ऑक्टोबर
- इंग्लंड विरुद्ध बांगलादेश, बारसापारा क्रिकेट स्टेडियम (गुवाहाटी)
- न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका, ग्रीनफिल्ड इंटरनॅशनल स्टेडियम (तिरुवनंतपुरम)
3 ऑक्टोबर
- अफगाणिस्तान विरुद्ध श्रीलंका, बारसापारा क्रिकेट स्टेडियम (गुवाहाटी)
- भारत विरुद्ध नेदरलँड्स, ग्रीनफिल्ड आंतरराष्ट्रीय स्टेडियम (तिरुवनंतपुरम)
- पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया, राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियम (हैदराबाद)
विश्वचषकाला 5 ऑक्टोबरपासून होणार सुरुवात
भारतात होणारा एकदिवसीय विश्वचषक 5 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. टीम इंडिया या विश्वचषकात आपला पहिला सामना 8 ऑक्टोबर रोजी पाचवेळा चॅम्पियन ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळणार आहे. यानंतर 14 ऑक्टोबरला भारत आणि पाकिस्तान यांच्यात मोठा सामना होणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर हा सामना होणार आहे.