ODI World Cup 2023 (Photo Credit - Twitter)

क्रिकेट चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. बीसीसीआयने (BCCI) वर्ल्ड कपसाठी (ICC Men’s Cricket World Cup 2023) BookMyShow ची तिकीट प्लॅटफॉर्म म्हणून घोषणा केली आहे. अशा प्रकारे क्रिकेट चाहत्यांना BookMyShow वर वर्ल्ड कपसाठी ऑनलाइन तिकीट बुक करता येणार आहे. क्रिकेट प्रेमींना 24 ऑगस्टपासून चाहत्यांना आगामी विश्वचषकाची तिकिटे खरेदी करता येणार आहेत. 24 ऑगस्टला संध्याकाळी 6 वाजल्यापासून ऑनलाइन तिकिटे उपलब्ध होतील. विश्वचषक सामन्यांव्यतिरिक्त, चाहत्यांना त्यापूर्वी सराव सामन्यांची ऑनलाइन तिकिटे देखील बुक करता येतील.

मात्र, विश्वचषक स्पर्धेतील भारतीय सामन्यांची तिकिटे 29 ऑगस्ट संध्याकाळी 6 वाजल्यापासून उपलब्ध होणार आहेत. तर उपांत्य आणि अंतिम सामन्यांची तिकिटे 14 सप्टेंबरला संध्याकाळी 6 वाजल्यापासून उपलब्ध होणार आहेत. अशा प्रकारे क्रिकेट चाहत्यांना जागतिक सामन्यांची तिकिटे ऑनलाइन बुक करता येतील. येत्या 5 ऑक्टोबरपासून विश्वचषक 2023 चे आयोजन केले जात आहे. या स्पर्धेतील पहिला सामना 5 ऑक्टोबरला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे.

वर्ल्ड कप 2023 मध्ये एकूण 58 सामने खेळवले जाणार आहेत. याआधी 10 सराव सामने होणार आहेत. 2023 चा विश्वचषक भारतातील 12 वेगवेगळ्या मैदानांवर खेळवला जाणार आहे. भारतीय संघ आपल्या विश्वचषक मोहिमेची सुरुवात ऑस्ट्रेलियाविरुद्ध करणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामना 8 ऑक्टोबर रोजी चेन्नई येथे होणार आहे. तर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना 14 ऑक्टोबरला होणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि पाकिस्तानचे संघ आमनेसामने असतील. (हेही वाचा: Shubman Gill On Rohit Sharma: आशिया चषकापूर्वी शुभमन गिलने उघडले मोठे रहस्य, रोहितसोबतच्या ओपनिंगवर म्हणाला...)

भारतीय चाहत्यांनी आयसीसी विश्वचषक 2023 साठी हॉटेल आणि विमानाची तिकिटे देखील बुक करणे सुरू केले आहे. आत्तापर्यंत, सामन्यांच्या तिकिटांची किंमत समोर आलेली नाही, परंतु ती 500 ते 10,000 रुपयांपर्यंत असू शकते असा अंदाज आहे. यापूर्वी भारताने 1987, 1996 आणि 2011 मध्ये या स्पर्धेचे सह-यजमानपद भूषवले आहे.