भारतीय क्रिकेट संघाला शुभमन गिलच्या (Shubman Gill) रूपाने एक उत्कृष्ट सलामीवीर मिळाला आहे. रोहित शर्मासोबत शुभमनची जोडी भारतासाठी एकदिवसीय आणि कसोटी फॉरमॅटमध्ये दीर्घकाळ आश्चर्यकारक कामगिरी करत आहे. ही जोडी येत्या आशिया चषक आणि विश्वचषकात टीम इंडियासाठी सलामीला येईल. आता गिलने रोहितसोबत ओपनिंग करण्याबाबत मोठे वक्तव्य केले आहे. भारताचा युवा फलंदाज शुभमन गिल असे मानतो की त्याच्या आणि कर्णधार रोहित शर्माच्या वेगवेगळ्या फलंदाजीच्या शैलीमुळे त्यांची सलामीची जोडी यशस्वी झाली आहे. भारतीय संघाने आशिया चषक आणि विश्वचषक स्पर्धेत प्रवेश केला तर या जोडीवरच संघाचे यश बरेचसे अवलंबून असेल. गिल आणि रोहितने 9 सामने खेळून वनडेमध्ये 685 धावा केल्या आहेत.
गिलने 'आयसीसी'ला सांगितले की रोहितला पॉवरप्लेमध्ये एरियल शॉट्स मारणे आवडते आणि मी अंतर शोधून चौकार मारतो. त्याला षटकार मारायला आवडतात. माझ्या मते ही जोडी त्यांच्या वेगळ्या शैलीमुळे यशस्वी झाली आहे. रोहितसोबत फलंदाजीबद्दल बोलताना तो म्हणाला की, कर्णधार त्याला त्याचा नैसर्गिक खेळ खेळण्याचे स्वातंत्र्य देतो. तो म्हणाला की, त्याच्यासोबत डावाची सलामी देणे खूप छान आहे. विशेषत: जेव्हा हे माहित असेल की संपूर्ण लक्ष त्यांच्याकडे असेल. तो इतर फलंदाजांना मुक्तपणे खेळू देतो.
रोहित खेळाडूंना स्वातंत्र्य देतो
रोहित म्हणाला की, तो खेळाडूंना पूर्ण स्वातंत्र्य देतो. भारतीय संघ आशिया चषक स्पर्धेतील पहिला सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध २ सप्टेंबर रोजी कॅंडी येथे खेळणार आहे. त्याचवेळी, वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया 8 ऑक्टोबर रोजी चेन्नईमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिला सामना खेळणार आहे.