ICC World Cup 2019: उद्या (5 जून) भारतीय संघाचा (Indian Team) वर्ल्ड कप 2019 मधील पहिला सामना दक्षिण आफ्रिका (South Africa) संघासोबत खेळवला जाणार आहे. तत्पूर्वी भारतीय संघातील खेळाडू जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) यांची डोप टेस्ट (Doping Test) करण्यात आली आहे. तर जागतिक उत्तेजक चाचणी संघटनेच्या मान्यताप्राप्त संस्थेमध्ये बुमराहची चाचणी करण्यात आली आहे.
रोज बाऊल स्टेडिअमवर भारतीय संघाचा सराव सुरु होता. त्यावेळी उत्तेजक नियंत्रण अधिकाऱ्यांनी त्याला डोप टेस्टसाठी घेऊन गेले. ही चाचणी दोन पद्धतीमध्ये केली जाते. त्यामध्ये प्रथम युरिन टेस्ट आणि दुसऱ्या वेळेस रक्ताचे नमूने घेण्यात आले. तर आईसीसीच्या स्पर्धांमध्ये जागतिक उत्तेजक विरोधी संस्था वाडा यांच्याकडून डोप टेस्ट करण्यात येते.(भारतीय संघ आणि क्रिकेटप्रेमींसाठी चिंताजनक बाब; सराव करताना कर्णधार विराट कोहली जखमी)
बीसीसीआयमधील सूत्रांनी बुमराहच्या डोप टेस्टला दुजोरा दिला आहे. त्यामुळे अन्य दुसऱ्या खेळाडूंची चाचणी केली जाणार का या बद्दल आता प्रश्न उपस्थित केला जात आहे.