ICC Awards 2020: आयसीसीचे वार्षिक पुरस्कार घोषित; विराट कोहली दशकातील सर्वोत्तम क्रिकेटर, एमएस धोनी 'या' पुरस्काराचा मानकरी
विराट कोहली आणि एमएस धोनी

ICC Awards 2020: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) आज 28 जानेवारी, 2020 रोजी वर्षातील पुरस्कार जाहीर केले आहेत. या पुरस्कारामध्ये भारताचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) दशकातील सर्वोत्तम वनडे क्रिकेटर (ODI Player of The Decade) तर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टिव्ह स्मिथ (Steve Smith) दशकातील सर्वोत्तम टेस्ट खेळाडू ठरला. आयसीसी पुरस्काराच्या काळात विराटने 10,000 धावा केल्या ज्यात 39 शतके, 48 अर्धशतकांचा समावेश आहे. कोहलीने 2010-19 दरम्यान सर्वाधिक आंतरराष्ट्रीय धावा केल्या असून या काळात सर्वाधिक आंतरराष्ट्रीय शतकं करण्याच्या यादीत देखील तो अव्वल स्थानावर आहे. तसेच या संपूर्ण वर्षभरात त्याने चांगली कामगिरी केली आहे. गेल्या दशकात विराटने 2090 चौकारांच्या मदतीने 18,726 धावा केल्या आहेत. यात त्याच्या 63 शतकांचा समावेश आहे. यावर्षीचा आयसीसीचा वर्षातील सर्वोत्तम क्रिकेटपटूचा सर गारफिल्ड सोबर्स पुरस्कार विराट कोहलीला देण्यात आला तर अफगाणिस्तानचा लेगस्पिनर राशिद खान (Rashid Khan) याला दशकाचा टी-20 क्रिकेटपटू म्हणून गौरविण्यात आले. (ICC Team Of The Decade: आयसीसीकडून दशकातील सर्वोत्तम एकदिवसीय, टी-20 आणि कसोटी संघाची घोषणा; भारतीय खेळाडूंकडे तिन्ही संघाचे नेतृत्व)

भारताचा माजी वर्ल्ड कप विजेता कर्णधार एमएस धोनीला (MS Dhoni) खेळाडूवृत्ती पुरस्कार म्हणजेच स्पिरिट ऑफ क्रिकेट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. 2011 नॉटिंगहॅम कसोटी सामन्यात इयान बेल रनआऊट असतानाही धोनीने खेळाडूवृत्ती दाखवून फलंदाजाला पुन्हा मैदानावर बोलावले ज्याच्यासाठी त्याला दशकचा आयसीसी स्पिरिट ऑफ क्रिकेटचा पुरस्कार पटकावला. दुसरीकडे, आयसीसीच्या दशकांच्या महिला पुरस्कारांमध्ये ऑस्ट्रेलियाच्या एलीस पेरीने तीनही पुरस्कार जिंकले. यामध्ये आयसीसीच्या दशकातील महिला एकदिवसीय खेळाडू, दशकातील सर्वोत्तम महिला क्रिकेटर आणि दशकची सर्वोत्तम टी-20 महिला खेळाडू पुरस्कार आहेत. शिवाय, यापुर्वी आयसीसीने जाहीर केलेल्या तिन्ही संघात स्थान मिळविण्यात विराट कोहली यशस्वी ठरला. महिला क्रिकेटसाठी आयसीसीने दशकातील एकदिवसीय आणि टी-20 संघाचीही घोषणा केली, ज्यात मिताली राज आणि हरमनप्रीत कौर यांनी स्थान मिळवले.

2020 वर्षासाठी आयसीसीचे पुरस्कार:

सर गारफिल्ड सोबर्स पुरस्कार सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू, (दशकातील सर्वोत्तम खेळाडू) विराट कोहली - (भारत)

दशकातील सर्वोत्तम महिला खेळाडू: एलिस पेरी - (ऑस्ट्रेलिया)

दशकातील सर्वोत्तम टेस्ट खेळाडू: स्टिव्ह स्मिथ - (ऑस्ट्रेलिया)

दशकातील सर्वोत्तम पुरुष वनडे क्रिकेटर: विराट कोहली - (भारत)

दशकातील सर्वोत्तम महिला वनडे क्रिकेटर: एलिस पेरी - (ऑस्ट्रेलिया)

दशकातील सर्वोत्तम टी-20 पुरुष खेळाडू: राशिद खान - (अफगाणिस्तान)

खेळाडूवृत्ती पुरस्कार (स्पिरिट ऑफ क्रिकेट): एमएस धोनी - (भारत)