आंतरराष्ट्रीय क्रिकेट कौन्सिलने (International Cricket Council) मंगळवारी आयसीसी प्लेअर ऑफ द मंथ (Player of the Month) पुरस्कारासाठी शॉर्टलिस्टेड उमेदवारांची घोषणा केली आहे. इंग्लंडचा कर्णधार जो रूट (Joe Root) आणि आयर्लंडचा ज्येष्ठ क्रिकेटपटू पॉल स्टर्लिंग (Paul Stirling) यांच्यासह नुकतंच ब्रिस्बेनमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध (Australia) सामन्यात विजयी खेळी करणारा भारताचा रिषभ पंतला (Rishabh Pant) पुरस्कारासाठी नामांकन देण्यात आले आहे. पंतने टीम पेनच्या नेतृत्वातील ऑस्ट्रेलियाविरुद्ध दोन कसोटी सामने खेळले आणि टेस्ट सामन्यात परदेशात आणखी एक संस्मरणीय कामगिरी केली. पंतने सिडनी टेस्टमध्ये 97 आणि ब्रिस्बेन टेस्ट सामन्यात नाबाद 89 धावा केल्या. श्रीलंकेविरुद्ध दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत इंग्लंडच्या कर्णधाराने अनुक्रमे 228 आणि 186 धावांची निर्णायक खेळी करत संघाला 2-0 असा विजय मिळवून दिला. आयर्लंडच्या पॉल स्टर्लिंगने युएईविरुद्ध दोन वनडे आणि अफगाणिस्तानविरुद्ध 3 वनडे सामने खेळे ज्यात त्याने तीन शतक केले. (ICCने ‘Player of the Month’ पुरस्काराची केली घोषणा, रिषभ पंत, अश्विनसह टीम इंडियाचे 'हे' तडाखेबाज खेळाडू शर्यतीत)
महिला खेळाडूंमध्ये पाकिस्तानची डायना बेग (Diana Baig) आणि दक्षिण आफ्रिकेच्या शबनीम इस्माईल (Shabnim Ismail) व मेरीझान कॅप (Marizanne Kapp)यांना नामांकन देण्यात आले आहे. पाकिस्तानच्या बेगने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन वनडे आणि दोन टी-20 सामने खेळले. आफ्रिकेविरुद्ध वनडे सामन्यांच्या मालिकेत तिने 9 सर्वाधिक विकेट घेतले. दक्षिण आफ्रिकेच्या इस्माईलनेही पाकिस्तानविरुद्ध तीन वनडे आणि दोन टी-20 सामने खेळेल आणि पाकिस्तानविरुद्ध एकदिवसीय मालिकेतील सात गडी बाद केले, तर दुसऱ्या टी-20 सामन्यात पाच गडी बाद केले. सह अष्टपैलू मेरीझान कॅपने पाकिस्तानविरुद्ध दोन वनडे आणि दोन टी-20 सामने खेळले आहेत. कॅपने 110.57च्या सरासरीने 115 धावा केल्या आणि पाकिस्तानविरुद्ध वनडे मालिकेत तीन विकेट्सही घेतल्या.
यानंतर आयसीसीची स्वतंत्र व्होटिंग अॅकॅडमी आणि जगभरातील चाहत्यांकडून मते मिळाल्यावर विजेत्यांची घोषणा आयसीसीच्या डिजिटल वाहिन्यांवर सोमवारी 8 फेब्रुवारी रोजी होईल. महिन्याभरात आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व प्रकारात उत्तम कामगिरी करणाऱ्या पुरुष आणि महिला क्रिकेटपटूंचा सन्मान करणे हे यामागील उद्दीष्ट आहे. दर महिन्याच्या पुरस्कार विजेत्यांची घोषणा दुसर्या सोमवारी करण्यात येईल.