SRH vs DC (Photo Credit - X)

SRH vs DC IPL 2025 55th Match: आयपीएल 2025 चा 55 वा (IPL 2025) सामना सनरायझर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्स (SRH vs DC) यांच्यात खेळला जाणार आहे. हा सामना 5 मे रोजी हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर संध्याकाळी 7.30 वाजता खेळला जाईल. प्लेऑफच्या आशा जिवंत ठेवण्यासाठी पॅट कमिन्स आणि कंपनीला हा सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकावा लागेल. दुसरीकडे, गेल्या दोन सामन्यांमध्ये दिल्ली कॅपिटल्सला पराभवाचा सामना करावा लागला आहे. अशा परिस्थितीत, अक्षर पटेलच्या नेतृत्वाखालील दिल्ली संघ तिसऱ्या पराभवाचा धोका पत्करू इच्छित नाही. त्यामुळे आजचा सामना कोण जिंकणार याकडे लक्ष असणार आहे.

हेड टू हेड रेकॉर्ड (SRH vs DC Head to Head Record)

आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्स 25 सामन्यांमध्ये आमनेसामने आले आहेत, ज्यामध्ये एसआरएचने 13 सामने जिंकले आहेत. तर, दिल्ली कॅपिटल्सने 12 सामने जिंकले आहेत. तथापि, गेल्या 5 सामन्यांमध्ये दिल्ली संघाने 3 सामने जिंकले आहेत तर एसआरएचने फक्त 2 वेळा विजय मिळवला आहे. (हे देखील वाचा: TATA IPL 2025 Points Table Update: लखनौ सुपर जायंट्सला हरवून पंजाब किंग्ज दुसऱ्या स्थानी, येथे पाहा अपडेटेड पॉइंट टेबल)

किती वाजता सुरु होणार सामना?

सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स आयपीएल 2025 चा 55 वा सामना शनिवार, 05 मे रोजी खेळला जाईल. हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होईल. या सामन्यात दोन्ही संघांचे कर्णधार टॉसच्या अर्धा तास आधी म्हणजेच संध्याकाळी 7 वाजता मैदानावर असतील.

कुठे पाहणार लाईव्ह सामना?

भारतीय चाहते स्टार स्पोर्ट्स नेटवर्क तसेच स्पोर्ट्स 18 नेटवर्कवर टीव्हीवर SRH विरुद्ध DC आयपीएल 2025 चा 55 वा सामना थेट पाहू शकतील. येथे वेगवेगळ्या चॅनेलवर वेगवेगळ्या भाषांमध्ये समालोचन ऐकण्यासाठी उपलब्ध असेल. तसेच सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग तुम्ही JioHotstar वर पाहू शकाल. येथे तुम्हाला हिंदी आणि इंग्रजीसह अनेक भारतीय भाषांमध्ये समालोचन ऐकायला मिळेल.