Punjab Kings vs Lucknow Super Giants, TATA IPL 2025 54th Match: आयपीएल 2025 चा 54 सामना (IPL 2025) 4 मे रोजी पंजाब किंग्ज आणि लखनौ सुपर जायंट्स (PBKS vs LSG) यांच्यात हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, धर्मशाळा येथे खेळवला गेला. या रोमांचक सामन्यात पंजाब किंग्जच्या संघाने लखनौ सुपर जायंट्सचा 37 धावांनी पराभव केला. यासह, पंजाब किंग्जच्या संघाने या हंगामात सातवा विजय मिळवला आहे. त्याआधी, लखनौने टाॅस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या पंजाबने लखनौसमोर 237 धावांचे लक्ष्य ठेवले. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या लखनौचा संघ 199 धावा करु शकला. या मोठ्या विजयानंतर पंजाबने पॉइंट टेबलमध्ये दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. तर लखनौची सातव्या स्थानी घसरण झाली आहे.
IPL 2025 POINTS TABLE. 📈
- RCB with 16 Points.
- PBKS with 15 Points.
- MI & GT with 14 Points. pic.twitter.com/CA7C0HRQI4
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) May 4, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)