2002 नेटवेस्ट मालिका (NatWest Series) फायनल सामना भारत (India) आणि इंग्लंडमध्ये (England) लॉर्ड्सच्या (Lords) मैदानावर खेळला गेला. भारताच्या विजयानंतर कर्णधार सौरव गांगुलीने लॉर्ड्सच्या बाल्कनीमधून टीम इंडियाची जर्सी फडकावली होती. या ऐतिहासिक सामन्यात टीम इंडियाने 326 धावांच्या मोठ्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग केला. त्यावेळी आंतरराष्ट्रीयवनडेमध्ये 300 पेक्षा अधिक धावांचा पाठलाग करणे एक मोठी गोष्ट मानली जात होती. त्या सामन्यात युवराज सिंह (Yuvraj Singh) आणि मोहम्मद कैफ (Mohammad Kaif) टीम इंडियाच्या विजयाचे नायक होते. त्या सामन्यात गांगुलीने कैफला एक खास संदेश दिला, जो नुकताच कैफ आणि युवीने उघड केला होता. कोविड-19 मुळे जगातील सर्व खेळांचे कार्यक्रम पुढे ढकलण्यात आले आहेत. दरम्यान, माजी क्रिकेटपटू आणि सध्याचे क्रिकेटपटू सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी जोडलेले आहेत. अलीकडेच युवराज आणि कैफने इन्स्टाग्राम लाइव्ह चॅट दरम्यान चाहत्यांसह अनेक मजेदार किस्से शेअर केले त्यातील नेटवेस्ट सामन्याचा हा एक मजेदार किस्सा होता. (2002 नेटवेस्ट फायनल: इंग्लंडविरुद्ध दिसली टीम इंडियाची 'दादागिरी', 'या' कारणामुळे लॉर्ड्सच्या बाल्कनीत सौरव गांगुलीने हवेत फहरावला होता शर्ट)
टीम इंडिया अंतिम सामन्यात अडचणीत सापडला होता आणि युवी व कैफ क्रीजवर होते. यावेळी कर्णधार सौरव वारंवार पॅव्हिलिअनमधून कैफला एक धाव घेऊन युवीला स्ट्राईक देण्यासाठीओरडत होता.
कैफ: "मला आठवते दादा जोरदार ओरडत होता-एक धाव घे युवीला स्ट्राईक दे."
युवराज: "दादा मला स्ट्राईक देण्यासाठी सांगत होता, तो पुन्हा पुन्हा ओरडत होता की सिंगल, सिंगल आणि पुढच्या बॉलवर तू काय केले?"
कैफ: "मला एक शॉर्ट बॉल आला आणि मी पुल शॉट मारला आणि आम्हाला एक षटकार मिळाला."
युवराज: "षटकार मारल्यानंतर तू काय केलेस? तू माझ्याकडे आलास आणि ग्लोव्ह्जवर पंच देऊन म्हणाला- 'आम्हीसुद्धा खेळायला आलो आहोत!' त्यानंतर दादा शांत होऊन बसला. त्याला समजले की कैफ देखील षटकार ठोकू शकतो."
कैफ (हसला): "मला आठवते की काही खेळाडू मैदानावर पाणी आणण्यास तयार होता, कारण दादाला सूचना पाठवायची होती की मी सिंगल घेऊ, पण त्या षटकारानंतर कोणीही आले नाही. दादा म्हणाले, "प्रत्येकजण, आपण जेथे आहात तेथे बसून राहा."
त्या सामन्यात कैफने 75 चेंडूत 87 धावांची खेळी केली. यात त्याने दोन षटकार आणि 6 चौकार ठोकले. कैफ अखेर पर्यंत नाबाद राहिला. त्याने युवी आणि नंतर हरभजन व झहीरबाबर शानदार डाव खेळला आणि भारताचा विजय निश्चित केला.