KXIP vs DC 38th IPL 2020 Match: गतविजेत्या मुंबई इंडियन्सविरुद्ध रोमांचक सामन्यात विजयानंतर किंग्ज इलेव्हन पंजाबचे (Kings XI Punjab) मनोबल वाढेल, पण आता सातत्यपूर्ण कामगिरी करण्यात अपयशी ठरलेल्या या संघाचा मार्ग सुलभ होणार नाही कारण मंगळवारी इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) आजच्या सामन्यात त्यांचा सामना गुणतालिकेत अव्वल असलेल्या दिल्ली कॅपिटल्सशी (Delhi Capitals) सामना होईल. दोन्ही संघांमधील मागील सामना सुपर ओव्हरमध्ये गेला होता आणि दिल्लीपेक्षा पंजाबची टीम असे पुन्हा होणार नाही यासाठीआशावादी असेल. हंगामाच्या सुरूवातीला दोन अगदी जवळील सामने गमावल्यानंतर गेल्या दोन सामन्यांमध्ये किंग्ज इलेव्हनने इच्छित निकाल मिळविण्यात यश मिळविले. दुसरीकडे, दिल्ली कॅपिटल्स स्पर्धेतील आजवरची सर्वात यशस्वी टीम राहिली आहे. ते गुणतालिकेत अव्वल असून आजच्या सामन्यात विजय मिळवून प्ले-ऑफमध्ये स्थान निश्चित करण्याच्या निर्धारित असतील. (KXIP vs DC, IPL 2020 Live Streaming: किंग्स इलेव्हन पंजाब आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील आयपीएल लाईव्ह सामना आणि स्कोर पाहा Hotstar आणि Star Network वर)
कोरोना व्हायरसचा वाढत प्रादुर्भाव लक्षात घेता क्रिकेट विश्वातील सर्वात लोकप्रिय टी-20 लीग आयपीएल यंदा भारताऐवजी युएईमध्ये खेळवली जात आहे. जर तांत्रिक अडणींनीमुळे तुम्हाला या लीगमधील सामने टीव्ही पाहता येत नसेल तर, चिंता करण्याची गरज नाही. आपण डिस्नी+ हॉटस्टार अॅप वर आयपीएल लाइव्ह पाहू शकतात. हॉटस्टार यावर्षी आयपीएलचा स्ट्रीमिंग पार्टनर आहे. अशा स्थितीत, डिस्नी+ हॉटस्टारवर किंग्ज इलेव्हन पंजाब आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात रंगणारा आजचा सामना देखील पाहता येणार आहे. हा सामना संध्याकाळी 7.30 वाजेपासून लाईव्ह प्रक्षेपित केला जाईल.
पाहा हॉटस्टार डाउनलोड करण्याची पद्धत:
1. प्रथम, आपल्या मोबाईमधील इंटरनेट सुरु करा आणि प्ले- स्टोर उघडून हॉटस्टार ऍप शोधा.
2. यानंतर इन्स्टॉल ऑप्शनवर जाऊन हॉटस्टार ऍप आपल्या फोनमध्ये इन्स्टॉल करा.
3. इन्स्टॉल केल्यानंतर, आपल्या मोबाईलच्या मेनूमध्ये किंवा मुख्यपृष्ठावर हॉटस्टार अॅप चिन्ह दिसेल.
4. यानंतर आपण आपल्या जीमेल किंवा फेसबुक अकाउंटवरून साइन इन करून किंवा आवश्यक तपशील देऊन अॅप उघडू शकतात.
5. साइन इन होताच आपण लाईव्ह व्हिडिओ, क्रीडा टूर्नामेंट जसे की आयपीएल, टीव्ही मालिका, चित्रपट आणि बरेच काही हॉटस्टार वर पाहता येणार आहे.
हिंदी, इंग्रजी, बंगाली, तामिळ, पंजाबी अशा बर्याच भाषांमध्ये हॉटस्टार उपलब्ध आहे. टीव्ही मालिका, बातम्या, चित्रपट यासह हॉटस्टारवर 1 लाख तासांपर्यंतची व्हिडीओ कन्टेन्ट उपलब्ध आहे.