IPL 2025 (Photo Credit - X)

IPL 2025 Prize Money: गुजरात टायटन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्ज यांनी आतापर्यंत आयपीएल 2025 च्या प्लेऑफमध्ये स्थान मिळवले आहे. चौथ्या स्थानासाठीची लढाई देखील रंजक आहे. या तीन संघांपैकी दोन संघ असे आहेत ज्यांनी कधीही इंडियन प्रीमियर लीगचे विजेतेपद जिंकलेले नाही. जर दिल्ली कॅपिटल्सनेही शेवटच्या 4 मध्ये प्रवेश केला तर आयपीएल 2025 मध्ये नवीन चॅम्पियन होण्याची शक्यता वाढेल. आता अंतिम सामना फार दूर नाही, त्याआधी जाणून घ्या आयपीएल 2025 च्या विजेत्या संघाला किती बक्षीस रक्कम मिळेल आणि प्लेऑफमध्ये न पोहोचणाऱ्या संघांनाही पैसे किती पैसे मिळतील?

आयपीएल 2025 बक्षीस रक्कम

इंडियन प्रीमियर लीगमधील बक्षीस रकमेत वर्षानुवर्षे वाढ होत आहे. 2021 मध्ये, बक्षीस रक्कम 20 कोटी रुपये करण्यात आली, त्यानंतर आयपीएलच्या विजेत्या संघाला दरवर्षी 20 कोटी रुपये बक्षीस मिळत आहे. आयपीएल 2025 च्या विजेत्या संघाला 20 कोटी रुपये मिळतील, तर उपविजेत्या संघाला 12.5 कोटी रुपये मिळतील. टेबलमध्ये तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या संघाला 7 कोटी रुपये आणि चौथ्या क्रमांकावर असलेल्या संघाला 6.5 कोटी रुपये मिळतील.

चॅम्पियन - 20 कोटी

उपविजेता - 12.5 कोटी

तिसरे स्थान - 7 कोटी रुपये

चौथे स्थान - 6.5 कोटी रुपये

आयपीएल 2025 च्या प्लेऑफमध्ये न पोहोचणाऱ्या संघांना बक्षीस रक्कम मिळेल की नाही हे अद्याप जाहीर झालेले नाही. प्लेऑफसाठी पात्र न ठरणाऱ्या संघांना बक्षीस रक्कम मिळेल की नाही याची माहिती अद्याप जाहीर केलेली नाही.

आतापर्यंत 3 संघ ठरले पात्र

आतापर्यंत गुजरात टायटन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्ज यांनी प्लेऑफसाठी पात्रता मिळवली आहे. 5 संघ बाद झाले आहेत, तर चौथ्या स्थानासाठी मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्समध्ये लढत सुरू आहे. प्लेऑफ सामने 29 मे पासून सुरू होतील आणि अंतिम सामना 3 जून रोजी अहमदाबाद येथे खेळवला जाईल.