Rohit Sharma And Virat Kohli (Photo Credit - X)

कानपूर: भारत आणि बांगलादेश यांच्यात दोन कसोटी सामन्याची मालिका (IND vs BAN Test Series 2024) खेळवली जात आहे. यांतील पहिला सामना चेन्नई (Chennai) येथे खेळवला गेला. जिथे भारतीय संघाने बांगलादेशवर 280 धावांनी विजय मिळवत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. त्याचवेळी, मालिकेतील दुसरा कसोटी सामना 27 सप्टेंबरपासून कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर (Kanpur Greean Park Stadium) खेळवला जाणार आहे. आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023-25 ​​च्या दृष्टिकोनातूनही हा सामना भारतीय संघासाठी खूप महत्त्वाचा आहे. अशा परिस्थितीत कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियममध्ये टीम इंडिया आणि खेळाडूंची कामगिरी कशी राहिली ते जाणून घेऊया.

कसा आहे रोहित शर्माचा रेकाॅर्ड?

कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माची बॅट खुप धावा करते. रोहित शर्माने ग्रीन पार्क स्टेडियमवर 2 शतके झळकावली आहेत. रोहित शर्मा या स्टेडियममध्ये आतापर्यंत एकूण 5 सामने खेळला आहे, ज्यामध्ये 4 वनडे आणि 1 कसोटी सामना आहे. या 5 सामन्यात त्याने एकूण 432 धावा केल्या आहेत. या मैदानावर रोहितने एकदिवसीय सामन्यात 2 शतके आणि कसोटी सामन्यात एक अर्धशतक झळकावले आहे. 2016 मध्ये खेळल्या गेलेल्या एकमेव कसोटी सामन्यात रोहित शर्माने चांगली कामगिरी केली होती. त्याने पहिल्या डावात 35 आणि दुसऱ्या डावात 68 धावांचे योगदान दिले.

कसा आहे विराट कोहलीचा रेकाॅर्ड?

विराट कोहलीबद्दल बोलायचे झाले तर त्याने या स्टेडियममध्ये शतकी खेळीही खेळली आहे. विराट कोहलीने या मैदानावर 4 वनडे आणि 1 कसोटी सामनाही खेळला आहे. यामध्ये विराटने एकूण 199 धावा केल्या आहेत. 2016 मध्ये विराट कोहली या मैदानावर एकमेव कसोटी सामना खेळला होता, ज्यामध्ये त्याला पहिल्या डावात केवळ 9 धावा आणि दुसऱ्या डावात 18 धावा करता आल्या होत्या. (हे देखील वाचा: IND vs BAN 2nd Test 2024: कानपूर कसोटीत बांगलादेश बिघडवणार टीम इंडियाचा खेळ? मैदानावरील आकडेवारी देत आहे साक्ष)

कानपूरच्या मैदानावर भारताची कशी आहे कामगिरी?

भारत 1952 पासून कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर कसोटी क्रिकेट खेळत आहे. टीम इंडियाने आतापर्यंत येथे एकूण 23 कसोटी सामने खेळले आहेत. यामध्ये भारताने 7 सामन्यात विजय मिळवला असून 3 सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्याचबरोबर 13 सामने अनिर्णित राहिले आहेत. टीम इंडियाने 2010 पासून येथे फक्त 2 कसोटी सामने खेळले आहेत. टीम इंडियाने हे दोन्ही सामने न्यूझीलंडविरुद्ध खेळले आहेत. 2016 मध्ये झालेल्या सामन्यात टीम इंडियाने बाजी मारली होती. तर, 2021 मध्ये भारताचा सामना अनिर्णित राहिला.