झिम्बाब्वेचा माजी अष्टपैलू खेळाडू हिथ स्ट्रीक यांचे निधन (Heath Streak's death Reports are fake) झाल्याचे वृत्त विविध प्रसारमाध्यमांतून झळकले आणि एकच खळबळ उडाली. वयाच्या 49 व्या वर्षी काळाने त्यांची हिट विकेट घेतल्याचे बोलले जाऊ लागले. परिणामी क्रिकेट आणि क्रिडा विश्वावर शोककळा पसरली. मात्र, अशी कोणतीही घटना घडली नाही. हिथ स्ट्रीक हे आपले आयुष्य आनंदाने जगत आहेत. त्यांच्या निधनाबद्दलचे वृत्त दिशाभूल करणारे असल्याची माहिती हेन्री Henry Olonga यांनी दिली आहे.
हेन्री ओलोंगा यांनी आपल्या ट्विटर हँडलवर हिथ स्ट्रीक यांच्यासोबत झालेल्या ताज्या संवादाचे स्क्रीन शॉट शेअर केले आहेत. या स्क्रिनशॉट सोबत केलेल्या पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे की, मी पुष्टी करू शकतो की हिथ स्ट्रीकच्या निधनाच्या अफवा अतिशयोक्तीपूर्ण आहेत. मी स्वत: त्याच्याकडून (स्ट्रीक) ऐकले की, तिसऱ्या पंचाने त्याला परत बोलावले आहे. तो खूप जिवंत आहे.
दरम्यान, हिथ स्ट्रीक पाठिमागील काही महिन्यांपासून ते कर्करोगाशी (Heath Streak Cancer) लढत होते. मैदानावर उत्कृष्ठ खेली करणाऱ्या सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक अशीत्यांची खास ओळख आहे. स्ट्रीकने त्याच्या कारकिर्दीत केलेल्या गोलंदाजीमध्ये 65 कसोटी सामने आणि 189 एकदिवसीय सामने खेळले.
हिथ स्ट्रीक यांनी आपल्या एकूण कारकीर्दीत 28.14 च्या सरासरीने 16 चार-विकेट आणि Seven Five-Fers सह सामन्याच्या सर्वात दीर्घ फॉरमॅटमध्ये 216 बळी घेतले. एकदिवसी सामन्यांमध्येही दमदार कामगीरी दाखवत त्यांनी 29.82 च्या सरासरीने 239 बळी घेतले. त्यांच्या एकदिवसीय कारकीर्दीत त्याने सात चार विकेट्स आणि एक फिफर (5/32) मिळवले.
कर्णधार म्हणूनही त्यांनी झिम्बब्वे क्रिकेट संघाचे आंतरराष्ट्रीय पातळीवर नेतृत्व केले. आपल्या फलंदाचीच्या कारकीर्दीत त्यांनी कसोटी क्रिकेटमध्ये 50 षटकांच्या फॉर्मेटमध्ये एकूण 2943 धावांसह 1990 धावा केल्या. आपल्या कसोटी कारकिर्दीत एक शतक आणि 11 अर्धशतके झळकावली तर एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 13 अर्धशतके ठोकली.
ट्विट
I can confirm that rumours of the demise of Heath Streak have been greatly exaggerated. I just heard from him. The third umpire has called him back. He is very much alive folks. pic.twitter.com/LQs6bcjWSB
— Henry Olonga (@henryolonga) August 23, 2023
स्ट्रीकचा एक खेळाडू म्हणून नेहमीच मोठा गौरव करण्यात आला. त्यांनी आपल्या कारकीर्दीत अनेक विक्रम केले. जे अद्यापही कोणी मोडले नाहीत. कसोटीत 1000 धावा आणि 100 विकेट्स आणि वनडेमध्ये 2000 धावा आणि 200 बळी घेणारा झिम्बाब्वेचा तो एकमेव खेळाडू आहे.