इंडियन प्रीमियर लीग 2023 च्या (IPL 2023) दुसऱ्या क्वालिफायरमध्ये गुजरात टायटन्सने शुक्रवारी मुंबई इंडियन्सचा 62 धावांनी (Gujarat Beat Mumbai) पराभव केला. या विजयासह गुजरात टायटन्सने सलग दुसऱ्यांदा आयपीएलच्या अंतिम फेरीसाठी पात्रता मिळवली आहे. संघाचा कर्णधार हार्दिक पांड्याने (Hardik Pandya) या विजयाचे श्रेय खेळाडूंच्या मेहनतीला दिले आणि शतकवीर शुभमन गिलचेही कौतुक केले. तो म्हणाला की, 'आमच्या इथपर्यंत पोहोचण्याचं सर्वात मोठं कारण म्हणजे सर्व खेळाडूंची सततची मेहनत. या सामन्यात शुभमन गिलची (Shubman Gill) खेळीही उत्कृष्ट ठरली. त्याने ज्या आत्मविश्वासाने आणि विचाराने फलंदाजी केली तो सर्वांनी पाहिला. आजची खेळी ही त्याच्या आतापर्यंतची सर्वोत्तम खेळी आहे.
गिल भविष्यातील सुपरस्टार खेळाडू
तो पुढे म्हणाला की, 'गिल त्याच्या डावात एकदाही दबावाखाली दिसला नाही. जणू कोणीतरी त्याला बॉल फेकत आहे आणि तो मारत आहे. गिल हा आंतरराष्ट्रीय क्रिकेट तसेच फ्रँचायझी क्रिकेटमधील भविष्यातील सुपरस्टार खेळाडू आहे. (हे देखील वाचा: Shubman Gill New Record: शुभमन गिलच्या ऐतिहासिक खेळीने अनेक विक्रमाला घातली गवसनी, प्लेऑफमध्ये रचला इतिहास)
अंतिम सामन्यासाठी आम्ही खूप उत्सुक आहोत- हार्दिक
हार्दिकने संघाच्या कामगिरीबद्दल आणि अंतिम सामन्यावर अधिक चर्चा केली. तो म्हणाला की, 'मी संघातील सर्व खेळाडूंशी बोललो आहे जेणेकरून प्रत्येक खेळाडू पूर्ण आत्मविश्वासाने मैदानात उतरेल. राशिद खान संघातील एक असा खेळाडू आहे ज्याच्याकडे मी दबावाखाली असतो. आम्ही नेहमीच मैदानावर 100 टक्के देण्याचा प्रयत्न करतो. बाद फेरीचे सामने दोन्ही बाजूने जाऊ शकतात, पण अंतिम सामना खेळण्यासाठी आम्ही खूप उत्सुक आहोत.