Harry Brook (Photo Credit - X)

Pakistan National Cricket Team vs England National Cricket Team 1st Test 2024: पाकिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध इंग्लंड राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना 12 ऑक्टोबरपासून खेळवला जात आहे. दोन्ही संघांमधील हा सामना मुलतानमधील मुलतान क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात इंग्लंडचा फलंदाज हॅरी ब्रूकने पाकिस्तानविरुद्ध मुलतान कसोटीत त्रिशतक झळकावले (Harry Brook Triple Century) आहे. हॅरी ब्रूकच्या कारकिर्दीतील हे पहिले त्रिशतक आहे. हॅरी ब्रूकच्या स्फोटक खेळीच्या जोरावर इंग्लंडने पहिला डाव 823 धावांवर घोषित केला. या स्फोटक खेळीदरम्यान हॅरी ब्रूकने जो रूटसोबत 400 हून अधिक धावांची उत्कृष्ट भागीदारीही केली.

'हा' भारतीय फलंदाज आहे अव्वल स्थानी

एकंदरीत पाहिले तर कसोटी क्रिकेटमधील हे दुसरे सर्वात वेगवान त्रिशतक आहे. सर्वात वेगवान त्रिशतक झळकावण्याचा विश्वविक्रम आजही टीम इंडियाचा माजी स्फोटक सलामीवीर वीरेंद्र सेहवागच्या नावावर आहे. वीरेंद्र सेहवागने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 278 चेंडूत 3000 धावा पूर्ण केल्या होत्या. हा सामना 2008-09 मध्ये चेन्नईत खेळला गेला होता.

कसोटीत सर्वात जलद त्रिशतक झळकवणारे फलंदाज (चेंडूंच्या बाबतीत)

या विशेष यादीत वीरेंद्र सेहवाग आणि हॅरी ब्रूक यांच्यानंतर ऑस्ट्रेलियाचा माजी फलंदाज मॅथ्यू हेडनचे नाव तिसऱ्या क्रमांकावर आहे. मॅथ्यू हेडनने 2003-2004 मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध 362 चेंडूत त्रिशतक पूर्ण केले होते. यानंतर पुन्हा एकदा वीरेंद्र सेहवागचे नाव पुढे आले आहे. वीरेंद्र सेहवागने पाकिस्तानविरुद्ध 364 चेंडूत त्रिशतक झळकावले होते. (हे देखील वाचा: Harry Brook Fastest 300 in Test: हॅरी ब्रूक मुलतानचा नवा 'सुलतान', अवघ्या 310 चेंडूत ठोकले त्रिशतक; अशी कामगिरी करणारा ठरला सेहवागनंतरचा दुसरा फलंदाज)

सर्वात वेगवान त्रिशतक झळकवणारे फलंदाज

278 चेंडू - वीरेंद्र सेहवाग विरुद्ध दक्षिण आफ्रिका, चेन्नई, 2008

310 चेंडू - हॅरी ब्रूक विरुद्ध पाकिस्तान, मुलतान, 2024

362 चेंडू - मॅथ्यू हेडन विरुद्ध झिम्बाब्वे, पर्थ, 2003

364 चेंडू - वीरेंद्र सेहवाग विरुद्ध पाकिस्तान, मुलतान, 2004

381 चेंडू - करुण नायर विरुद्ध इंग्लंड, चेन्नई, 2016

389 चेंडू - डेव्हिड वॉर्नर विरुद्ध पाकिस्तान, ॲडलेड, 2019

393 चेंडू - ख्रिस गेल विरुद्ध श्रीलंका, गॅले, 2010.

हॅरी ब्रूक 317 धावा करून बाद 

पाकिस्तानच्या मुलतानमध्ये इंग्लंडच्या स्फोटक हॅरी ब्रूकच्या शानदार खेळीला सैम अय्युबने ब्रेक लावला आहे. बाद होण्यापूर्वी हॅरी ब्रूकने 322 चेंडूत 98.45 च्या सरासरीने 317 धावा केल्या. यादरम्यान हॅरी ब्रूकच्या बॅटमधून 29 चौकार आणि 3 षटकारही आले.