भारतीय संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या (Hardik Pandya) खेळण्यापेक्षा त्याच्या दुखापतीमुळे जास्त चर्चेत असतो. आता आयपीएल 2024 च्या (IPL 2024) आधी एका मुलाखतीत तो दुखापतीवर टीका करणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर देताना दिसत आहे. त्याचवेळी, त्याने 2023 च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत बांगलादेशविरुद्ध गोलंदाजी करताना झालेल्या दुखापतीबद्दलही उघडपणे सांगितले की त्याच्या चुकीमुळे त्याची दुखापत आणखीनच वाढली होती. 2023 च्या वनडे वर्ल्ड कपमध्ये बांगलादेशविरुद्ध गोलंदाजी करताना तो जखमी झाला होता. त्या सामन्यात पांड्याला केवळ 3 चेंडू टाकता आले होते. आता पांड्यानेही विश्वचषकादरम्यान झालेल्या दुखापतीवर मौन सोडले आहे.
मी 1 वर्ष आधीच तयारी सुरू करतो
हार्दिक पांड्याने स्टार स्पोर्ट्सला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, तो असा खेळाडू आहे जो स्पर्धेच्या 2-3 महिने आधी नव्हे तर एक वर्ष आधी तयारी सुरू करतो आणि 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकासाठीही त्याने असेच केले होते. 2023 च्या विश्वचषकादरम्यान झालेल्या दुखापतीबाबत तो म्हणाला की, ज्यावेळी मला दुखापत झाली तेव्हा मला सांगण्यात आले होते की ही दुखापत 25 दिवसांत बरी होईल, पण माझ्या दुखापतीमुळे मी विश्वचषक खेळू शकलो नसतो. पण त्यावेळी मी परतण्याची तयारी जोरात केली होती.
पाहा व्हिडिओ
Hardik Pandya speaks first time on missing World Cup 2023.
"Missing WC will always going to be heavy on my heart"
Credits: Star Sports & BCCI#IPL2024 pic.twitter.com/q9zt3oVN8x
— Rohan Gangta (@rohan_gangta) March 17, 2024
दुखापतीमुळे बाहेर पडल्यावर मी माझ्या सहकाऱ्यांना सांगितले होते की, मी अवघ्या 5 दिवसांत पुनरागमन करेन. त्यावेळी मी अजिबात हार मानली नव्हती. पांड्या पुढे म्हणाला की, मी माझ्या संघासाठी काहीही करू शकतो. दुखापतीवर पांड्या म्हणाला की, मला त्यावेळी माहित होते की, माझी दुखापत दुरुस्त करण्याचा खूप प्रयत्न केला तर ती आणखी खराब होऊ शकते. पांड्या पुढे म्हणाला की, जर मला बरे होण्याची आणि संघात परतण्याची 1 टक्केही आशा असेल तर मी ते करण्यास तयार आहे. त्यावेळी मी स्वतःला खूप ढकलत होतो आणि माझी दुखापत 25 दिवसांची होती ती 3 महिन्यांपर्यंत वाढणार होती.
देशासाठी खेळणे माझ्यासाठी सर्वात महत्त्वाचे
देशासाठी क्रिकेट खेळणे ही त्याच्यासाठी अभिमानाची बाब असल्याचेही हार्दिक पांड्या या मुलाखतीत म्हणाला. विश्वचषकाबाबत हार्दिक पांड्याने असेही सांगितले की, विश्वचषक हा माझ्या मुलासारखा आहे आणि मला त्यावेळी विश्वचषक खेळायचा होता. त्यावेळी आपण विश्वचषक जिंकू की नाही हा वेगळा मुद्दा आहे, पण मला त्यावेळी विश्वचषक खेळायचा होता, असेही पांड्या म्हणाला. 2023 च्या वर्ल्ड कपमध्ये दुखापत झाल्यानंतर पांड्या बराच काळ क्रिकेटपासून दूर होता. आता तो पुन्हा एकदा आयपीएल 2024 मध्ये निळ्या जर्सीमध्ये मैदानात उतरण्यासाठी सज्ज झाला आहे.