Hardik Pandya-MS Dhoni Dance: Badshah च्या 'काला चष्मा' गाण्यावर हार्दिक पांड्या आणि धोनीने केला जबरदस्त डान्स; Watch Video
Hardik Pandya-MS Dhoni Dance (PC - Twitter/@msdfansofficial)

Hardik Pandya-MS Dhoni Dance: भारतीय क्रिकेट संघाचा (Indian Cricket Team) माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni) सध्या इंडियन प्रीमियर लीग 2023 (IPL 2023) च्या तयारीत व्यस्त आहे. हा सीझन महेंद्रसिंग धोनीचा शेवटचा सीझन असेल, असे बोलले जात आहे. पण याचदरम्यान धोनी डान्स करतानाचा एक व्हिडिओ समोर आला आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तुम्ही टीम इंडियाचा स्टार ऑलराऊंडर हार्दिक पंड्या (Hardik Pandya) आणि महेंद्रसिंग धोनी डान्स करताना दिसत आहे.

महेंद्रसिंग धोनी आणि हार्दिक पांड्याचा हा डान्स व्हिडिओ दुबईचा असल्याचं म्हटलं जात आहे, जो वाढदिवसाच्या पार्टीचा आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता की, येथे बॉलीवूड रॅपर बादशाह त्याच्या 'काला चष्मा' या लोकप्रिय गाण्यावर रॅप करताना दिसत आहे आणि महेंद्रसिंग धोनी, हार्दिक पांड्या, कृणाल पंड्या आणि ईशान किशन यांच्यासह अनेकजण त्याच्यासमोर नाचत आहेत. (हेही वाचा - M S Dhoni Wedding Anniversary: एम एस धोनी आणि पत्नी साक्षीच्या लग्नाचा आज वाढदिवस, सोशल मिडीयावर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव!)

स्टार खेळाडू हार्दिक पंड्या नुकताच न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेत कर्णधारपद भूषवून परतत आहे. तिथे त्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने मालिका 1-0 ने जिंकली. हार्दिक पांड्या सध्या एकदिवसीय मालिकेचा भाग नाही आणि तो दुबईमध्ये सुट्टीचा आनंद घेत आहे. (हेही वाचा - MS Dhoni Retires: ICC च्या तीन मोठ्या ट्रॉफी जिंकणारा एमएस धोनी एकमेव कर्णधार, पाहा त्याच्या करिअरमधील 5 खास क्षण)

 

View this post on Instagram

 

A post shared by MS Dhoni FC ? (@bleed.dhonism)

आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करणारा एमएस धोनी आता आयपीएल 2023 मध्ये दिसणार आहे. हा आयपीएल सीझन एमएस धोनीचा शेवटचा आयपीएल असेल, असा अंदाज वर्तवला जात आहे. एमएस धोनीने आधीच सांगितले आहे की तो आपला शेवटचा टी-20 सामना फक्त चेन्नईमध्येच खेळणार आहे.