M S Dhoni Wedding Anniversary: एम एस धोनी आणि पत्नी साक्षीच्या लग्नाचा आज वाढदिवस, सोशल मिडीयावर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव!
एमएस धोनी आणि पत्नी साक्षी (Photo Credit: Instagram)

कॅप्टन कुल महेंद्रसिंह धोनी आणि पत्नी साक्षी धोनीने आज त्यांच्या नात्याचा एक तप पूर्ण केला आहे. माही आणि साक्षीच्या लग्नाला आज बारा वर्ष पूर्ण झाले असुन या दामपत्यावर त्यांचे फॅन्स तसेच मित्र परिवाराकडून शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे. महेंद्रसिंग धोनी (Mahendra Singh Dhoni) त्याच्या  कुटुंबासोबत  लंडनला रवाना झाला आहे. म्हणजेच माही यावर्षी त्याच्या लग्नाचा वाढदिवस  लंडनमध्ये साजरा करणार आहे.

तसेच दोन दिवसांनंतर धोनी वयाचे 41 वर्ष पूर्ण करुन 42 व्या वर्षात पदार्पण करणार आहे. आज अलीकडेच धोनीची पत्नी साक्षी (Sakshi Dhoni) ने सोशल मीडियावर (Social Media) एक फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये तिने धोनी आणि झिवासोबत लंडनला पोहोचल्याचे सांगितले.  त्याचबरोबर भारतीय संघही सध्या लंडनमध्ये आहे. तर माही त्याच्या लग्नाचा तसेच त्याचा वाढदिवस टीम इंडियासोबत साजरा करणार असल्याची शक्यता नाकारता येणार नाही.

सोशल मिडीयावर धोनी आणि साक्षीचे फोटो शेअर करत धोनीच्या मित्रपरिवारीकडून तसेच त्याच्या फॅन्सकडून या दामपत्याला शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. धोनी आणि साक्षीचं कपल यांची पावर कपल अशी ओळख आहे. धोनी आणि साक्षीला गोंडस झिवा नावाची मुलगी असुन धोनी किंवा साक्षी कायमच त्याच्या कुटुंबाचे फोटो सोशल मिडीयावर शेअर करताना दिसतात.