हरभजन सिंह (Photo Credit: Getty)

भारताचा दिग्गज ऑफ स्पिनर हरभजन सिंह (Harbhajan Singh) सोशल मीडियावर कायम अ‍ॅक्टिव राहतो. सामाजिक प्रश्नां संदर्भातही तो आपले मत व्यक्त करत असतो. सध्या कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण क्रीडा विश्व ठप्प झाले आहे. भारतातील सर्वात प्रसिद्ध टी-20लीग इंडियन प्रीमिअर लीगही (Indian Premier League) पुढील सूचना येई पर्यंत स्थगित करण्यात आली आहे. त्यामुळे या लीगशी जोडलेले सर्व खेळाडू सध्या स्वतःला आणि चाहत्यांचे मनोरंजन करण्यासाठी सोशल मीडियाचा आधार घेत आहे. यासह ते आयपीएलची (IPL) आठवण करून जुन्या आठवणीही शेअर करत आहेत. हरभजनने स्वत: चा एक जुना व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो सलग तीन षटकार मारताना दिसत आहे. हरभजनने 2017 पर्यंत मुंबई इंडियन्सचे नेतृत्व केले आहे. मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आयपीएल जेते संघाचा तो सदस्य होता. हरभजन सोशल मीडियावर सतत कार्यरत राहतो. तो चाहत्यांना कोरोना विषाणूची जाणीव करुन देत आहे. (VIDEO: लॉकडाउनमध्ये बाबा एमएस धोनीसोबत जिवाने लुटला बाईक राईडचा आनंद, मम्मी साक्षीने दिली अशी रिअक्शन)

नुकताच त्याने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो मुंबई इंडियन्सकडून खेळताना दिसत आहे. या सामन्यात हरभजनने किंग्ज इलेव्हन पंजाबचा गोलंदाज अनुरीत सिंहच्या सलग तीन चेंडूंमध्ये तीन षटकार ठोकले. हा व्हिडिओ 2015 च्या आयपीएलचा आहे. या सामन्यात हरभजनने शानदार 64 धावा फटकावल्या पण तो आपला संघ जिंकू शकला नाही. त्याच्या खेळीत हरभजनने पाच चौकार आणि सहा षटकार लगावले होते. पाहा हा व्हिडिओ:

 

View this post on Instagram

 

IPL ✅🏏🇮🇳

A post shared by Harbhajan Turbanator Singh (@harbhajan3) on

2018 मध्ये मुंबई इंडियन्सने हरभजनला रिलीज केले होते. या नंतर भज्जी चेन्नई सुपर किंग्समध्ये सामिल झाला. 2018 मध्ये चेन्नईने आयपीएलचे विजेतेपद जिंकले. यावर्षी इंडियन प्रीमियर लीग 2020 अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आले आहे. कोरोनामुळे सर्व क्रीडापटू घरात कैद झाले आहेत आणि सोशल मीडियावर सक्रिय आहेत.