शोएब अख्तर, हरभजन सिंह (Photo Credit: Twitter/Instagram)

रावळपिंडी एक्सप्रेस (Rawalpindi Express) नावाने प्रसिद्ध पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर (Shoaib Akhtar) दुसऱ्यांदा पिता बनला आहे. शोएबने नुकतेच त्याच्या मुलासह गोंडस असा फोटो सोशल मीडियावर शेअर केला. याच्यावर टीम इंडियाचा माजी फिरकीपटू हरभजन सिंह (Harbhajan Singh) याने फिरकी घेत भन्नाट अशी प्रतिक्रिया दिली आहे. 2014 मध्ये शोएबने पत्नी रुबाब खान हिच्यासह निकाह केला. 2016 मध्ये शोएबला पहिल्यांदा पुत्र प्राप्ती झाली. अख्तरला आजवरचा सर्वात वेगवान गोलंदाजांपैकी एक म्हणून ओळखले जाते आणि याचे कारण म्हणजे त्याने त्याच्या भयानक वेगाने फलंदाजांना दिलेला त्रास आहे. पण मैदानाबाहेर अख्तरचे व्यक्तिमत्त्व अगदी वेगळंच आहे. या माजी क्रिकेटरला मजा करायला आवडते आणि त्याने आपल्या विनोदी पद्धतीने स्वत:साठी नाव कमावले आहे. (Match Fixing वर शोएब अख्तर याचा खळबळजनक खुलासा, पूर्ण पाकिस्तानी क्रिकेट टीमला म्हटले मॅच फिक्सर)

दरम्यान, अख्तरने पुन्हा एकदा ट्विटरवर एक हृदयस्पर्शी पोस्ट करून त्यांच्या सौम्य व्यक्तिमत्त्वाची जाणीव त्याच्या चाहत्यांना करू दिली आहे.अख्तरने त्याच्या दुसऱ्या मुलाचा फोटो शेअर केला आणि कॅप्शनमध्ये लिहिले, "हे माझ्या दुसऱ्या मुलासाठी पुरेसे नाही... त्याला सक्षम करा." अख्तरच्या या फोटोवर भज्जीने गुगली टाकत त्याला शुभेच्छा दिल्या. हरभजनने शोएबची फिरकी हेत म्हटले, "गती अद्याप कमी झालेली नाही" आणि लिहिले, ""देव त्याला आशीर्वाद दे ... अभिनंदन शोएब अख्तर, वेग काम नहीं हूई भाऊ..."

दरम्यान, भारत आणि बांग्लादेशच्या तिसऱ्या टी-20 सामन्यात विजयानंतर अख्तरने अलीकडेच भारताची स्तुती केली होती. टीम इंडियाने बांग्लादेशला 30 धावांनी पराभूत करत 2-1 ने मालिका जिंकली. यावर अख्तर म्हणाला की भारताने स्वत:ला बॉस म्हणून सिद्ध केले आणि बांग्लादेशने दर्शविलेल्या लढाबद्दल त्यांचे कौतुकही केले.