Happy Birthday Harbhajan Singh: जेव्हा वसीम अक्रम यांनी भज्जीची निंदा केली आणि म्हणाले, 'काहीतरी लाज बाळग!'
हरभजन सिंह (Photo Credit: Twitter)

आज भारताचा माजी क्रिकेटपटू हरभजन सिंह (Harbhajan Singh) याच वाढदिवस आहे. हरभजन यांना टर्बनेटर म्हणून ओळखले जाते. मात्र, ते जितके आपल्या उत्कृष्ट गोलंदाजीबद्दल चाहत्यांमध्ये प्रसिद्ध आहे तितकाच आपल्या मैदानावरील वागणुकीसाठी देखील तो तितकाच प्रसिद्ध आहे. क्रिकेटच्या आपल्या करिअरमध्ये हरभजनची मैदानात कित्येक खेळाडूंबरोबर लढला आहे. त्यात आयपीएल (IPL) मधील श्रीसंथ (Sreesanth) सोबतची तर लोकांच्या लक्षांत राहण्यासारखी आहे. हरभजनच्या यासारख्या अनेक गोष्टी आहेत. पण त्यातील एक आहे जो चांगल्या कारणाने आठवला जातो. आणि तो आहे माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू वासिम अक्रम (Wasim Akram) आणि भज्जी मधील किस्सा.

वासिमने एकदा भारत (India)-पाकिस्तान (Pakistan) सामन्यादरम्यान मैदानावर भज्जीच्या वागणुकीची निंदा केली आणि गैरवर्तन करण्याचे सोडून दे असेही म्हणते होते. मात्र, वासिमने भज्जीला शिवीगाळ भांडण म्हणून नाही तर काहीतरी सांगण्यासाठी केली. होय, अलीकडेच वासिम यांनी एका शोमध्ये त्याविषयी सांगितले. हा किस्सा सांगताना वासिम म्हणाले की एकदा भारत आणि पाकिस्तान संघाचे जेवण एकत्र होते आणि त्या वेळी भज्जी-मोहम्मद युसुफ (Mohammed Yousuf) चे भांडण झाले.

वासिम म्हणाले, "त्यानंतर मी दोघांना शिव्या दिल्या आणि हे सांगून बाहेर काढले की काहीतरी लाज बाळगा. मी आधीच त्यांना सांगितले होते की या सामन्यासाठी दोन्ही संघावर दबाव आहे, म्हणून आपल्याला सांभाळून राहायचे आहे. पण त्यांनी काही ऐकले नाही." या भांडणादरम्यान, सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) देखील उपस्थित होता पण त्याने या भांडणावर लक्ष दिले नाही आणि गाणी ऐकत दुर्लक्ष केले.

दरम्यान, भज्जीच्या खात्यात ऑफ-स्पिनरच्या रूपात हरभजनने तिसऱ्या जास्त विकेट्स घेतल्या आहेत तर भारतीय म्हणून सर्वाधिक बळी मिळवले आहेत. 2001 मध्ये अनिल कुंबळे (Anil Kumble) च्या दुखापतीनंतर माजी कर्णधार सौरव गांगुली (Sourav Ganguly) ने बॉर्डर-गावसकर (Border-Gavaskar) ट्रॉफीसाठी भारताच्या संघात हरभजनचा समावेश केला होता. 38 वा वाढदिवस साजरा करणाऱ्या हरभजनने आपला शेवटचा वनडे सामना मार्च 2016 रोजी पाकिस्तान विरुद्ध खेळला होता. हरभजनने भारतीय संघातून खेळताना 103 कसोटी सामन्यांमध्ये 417 विकेट्स घेतले आहेत. तर, 236 वनडे सामन्यात 269 विकेट्स घेतले आहेत.