युवराज सिंह (Photo Credits: IANS)

भारतीय संघाचा (Indian Team) सुपरस्टार असलेला मध्यम फळीतील माजी फलंदाज युवराज सिंह (Yuvraj Singh) आज आपला 38 वा वाढदिवस साजरा करीत आहे. 12 डिसेंबर 1981 रोजी चंदीगडमध्ये जन्मलेल्या युवराजने क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरीही लोकांच्या हृदयातले त्याचे स्थान अजूनही कायम आहे. त्याने भारतीय संघाला असे काही क्षण दिले आहे जे कायमस्वरूपी सोन्याच्या अक्षरात कैद झाले आहेत. अष्टपैलू म्हणून क्रिकेट कारकीर्दीची सुरुवात करणाऱ्या युवराजने वनडे आणि टी-20 फॉर्मेटमध्ये टीम इंडियाचा सर्वात मजबूत मधल्या फळीतील फलंदाज म्हणून आपली ओळख निर्माण केली. युवराजने कठीण परिस्थितीत अनेक वेळा आपल्या संघाला सामना जिंकवून दिला आहे. याचवर्षी विश्वचषक 2019 दरम्यान आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करणाऱ्या युवराजने आपल्या कारकीर्दीत एखाद्या खेळाडूला मिळवायचे असे सर्व काही साध्य केले. तो एकमेव खेळाडू आहे ज्याने तीन विश्वचषक जिंकले आहेत. (IPL 2020: युवराज सिंह कोलकाता नाइट रायडर्स संघाकडून खेळणार? KKR CEO वेंकी म्हैसूर यांच्या ट्विटने नव्या चर्चांना उधाण)

आपल्या कारकीर्दीत अनेक उतार-चढाव पाहिलेल्या युवीच्या नावावर अनेक विक्रमांची नोंद आहे. 2007 विश्वचषकमध्ये स्टुअर्ट ब्रॉडच्या (Stuart Broad) एका षटकात मारलेले सहा षटकार आणि 2011 विश्वचषकमध्ये भारताला विजय मिळविण्यात महत्वाची भूमिका, असे अनेक रेकॉर्ड युवीने 17 वर्षाच्या या कारकिर्दीत नोंदवले आहेत. आजच्या या खास चला जाणून घेऊया या स्टार खेळाडूच्या आयुष्याशी संबंधित काही मजेदार किस्से:

स्केटिंग चाहता, वडिलांचे स्वप्नपूर्तीसाठी बनला क्रिकेटपटू

जेव्हा वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी चंदीगडमधील एक तरुण स्केटिंग चाहता क्रिकेट मैदानात पोहोचला असेल तेव्हा तो पुढे जाऊन सुवर्ण इतिहास लिहिलं असे बहुधा कोणी विचारही केला नसेल. लहानपणी युवराजला रोलर स्केटिंगवर जास्त रस होता, त्याने नॅशनल अंडर-14 रॉलर स्केटिंग चँपियनशिपही जिंकली होती. पण, त्याच्या वडिलांनी त्याच्या स्केटिंगच्या प्रतिभेकडे दुर्लक्ष करत त्याला क्रिकेटवर लक्ष केंद्रित करायला सांगितले. युवीने केवळ आपल्या परिश्रमांनी इतिहास रचला नाही तर ते सर्व काही करून दाखवेल जात एक क्रिकेटपटूने करू इच्छित असतो.

प्रत्येक लढाईत विजयी

क्रिकेट सामना असो वा कर्करोगाविरूद्ध लढा, युवी फक्त विजयी म्हणून परतला आहे. 2011 वर्ल्ड कप दरम्यानयुवराज कर्करोगाचे निदान झाल्याचे समजले. हे जाणून युवी खचून गेला नाही, त्याने केवळ त्या कर्करोगाशीच लढा दिला नाही तर टीम इंडियामध्येही पुनरागमन केले.

एका षटकात सहा षटकारांची नोंद

2007 मध्ये क्रिकेटच्या इतिहासातील पहिल्या टी-20 विश्वचषकमध्ये युवीने इंग्लंडचा गोलंदाज स्टीवर्ड ब्रॉडच्या त्याच षटकात सहा षटकार ठोकले आणि अवघ्या 12 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. आजवर जागतिक क्रिकेटमध्ये युवीचा हा विक्रम कोणताही फलंदाज मोडू शकला नाही.

सचिन, धोनी आणि विराटसुद्धा हे आश्चर्यकारक कामगिरी करू शकले नाहीत

एमएस धोनी भारतीय क्रिकेट इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून ओळखला जातो. त्याने2007 चा टी-20 विश्वचषक आणि2011 वनडे विश्वचषक जिंकला पण 19 वर्षांखालील विश्वचषक जिंकू शकला नाही. विराटने अंडर-19 आणि वनडे विश्वचषक जिंकण्याची चव चाखली आहे, तर मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने फक्त वनडे विश्वचषक जिंकला आहे. पण युवराजने अंडर-19 विश्वचषक, टी-20 विश्वचषक आणि वनडे विश्वचषक असे तिन्ही स्पर्धा जिंकली आणि तिन्हीमध्ये महत्वाची भूमिका बजावली. नॅटवेस्ट सीरिजमध्ये भारताने इंग्लंडला त्यांच्याच घरीच हरवले तेव्हा युवराज मोहम्मद कैफसह स्टार खेळाडू म्हणून उभारला होता.

करिअरच्या अखेरच्या वेळीस युवराज फलंदाजीने काही खास करू शकला नाही. एकेकाळी भारताच्या वनडे संघाच्या मधल्या फळीतील महत्वाचा भाग असलेल्या युवीचा नेटवेस्ट मालिकेतील अंतिम सामना आणि 2011 विश्वचषकमधील उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळलेला डाव उल्लेखनीय आहे. आजही युवीचे चाहते युवीची ती खेळी विसरू शकलेले नाही.