Happy Birthday Shubman Gill: 19 व्या वर्षी मोडला गौतम गंभीरचा विक्रम, लाल रुमाल बाळगण्यामागे आहे मजेदार कहाणी; वाचा भारताच्या अंडर-19 विश्वचषकाच्या नायकाच्या आयुष्यातील 10 मजेदार गोष्टी

शुभमन गिल (Shubman Gill) याने घरगुती क्रिकेटमध्ये वेगवान प्रगती केली आहे. शुभमनने छोट्या वयात मोठी कामगिरी बजावली आहे. आणि आता पंजाबमध्ये जन्मलेला खेळाडू टीम इंडियामध्ये समावेशासाठी आतुर आहे. अनौपचारिक टूरमध्ये भारतीय संघाकडून सातत्यपूर्ण कामगिरी केली. 2018 मध्ये न्यूझीलंडमध्ये आयोजित अंडर-19 विश्वचषकमध्ये गिलने प्रभावी खेळी केली होती आणि चाहत्यांसह दिग्गज खेळांडूंमध्ये देखील आपली ओळख निर्माण केली होती. भारताच्या अंडर-19 मोहिमेत शुभमनने भारताच्या विजया मोलाचा वाट निभावला आणि देशाला चौथ्यांदा 19 वर्षाखालील संघाचे विश्वचषक जिंकण्यास सहाय्य केले.

अगदी लहान वयातच शुभमनने अनेक नामांकित गोष्टी मिळवल्या आहेत आणि मोठमोठ्या गोष्टींचा वेध त्याला लागले आहेत. 2018 मध्ये ज्युनियर विश्वचषक खेळणारा हा अत्यंत प्रतिभावान फलंदाज क्रिकेट जगतासाठी अनोळखी होता. त्याने 104.50 च्या सरासरीने 418 धावा करत क्रिकेट विश्वाचे लक्ष वेधून घेतले आणि अंडर-19 विश्वचषकात त्याला प्लेअर ऑफ द टूर्नामेंटच्या पुरस्काराने सन्मानित केले गेले. 19 वर्षीय शुभमनला नक्कीच खूप मोठा पल्ला गाठायचा आहे आणि पुढील काही वर्षात तो भारताचे आंतरराष्ट्रीय स्तरावर फुल-टाइम प्रतिनिधित्वदेखील करू शकेल. आज अंडर-19 टीम इंडियाच्या विश्वचषक हिरोचा 20 वा वाढदिवस आहे. आजच्या या खास दिवशी आपण जाणून घेऊया शुबमनबद्दल दहा गोष्टी जे आपल्याला माहित असणे आवश्यक आहे:

1. कोणत्याही आंतरराष्ट्रीय स्वरुपात (पुरुष / महिला / अंडर-19) 100 पेक्षा जास्त सरासरीने 1000 पेक्षा जास्त धावा करणारा शुभमन, हा एकमेव खेळाडू आहे. युवा वनडे क्रिकेटमध्ये शुमनने 15 डावांमध्ये 104.46 च्या सरासरीने 1149 धावा केल्या. पुरुषांच्या कसोटी क्रिकेटमध्ये सर डोनाल्ड ब्रॅडमन (Don Bradman) यांची 99.94 ची सरासरी कोणत्याही स्वरूपात 1000पेक्षा अधिक धावा असणार्‍या खेळाडूंमध्ये सर्वोत्कृष्ट आहे.

2. शुभमनने वेस्ट इंडिज ए (West Indies A) विरुद्ध झालेल्या अनधिकृत टेस्ट मॅचमध्ये 257 चेंडूत नाबाद 204 धावा. विंडीजविरुद्ध शतक जडतात गिलने गौतम गंभीर (Gautam Gambhir) याचा मोठा विक्रम मोडला आणि प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये दुहेरी शतक करणारा सर्वात युवा खेळाडू बनला. शुभमन गिलने वयाच्या अवघ्या 19 व्या वर्षी, 334 दिवसांत दुहेरी शतक झळकावले तर गंभीरने वयाच्या 20 व्या वर्षी 124 दिवशी झिम्बाब्वेविरुद्ध द्विशतक झळकावले होते.

3. शुभमन अंधश्रद्धांवर विश्वास ठेवतो आणि तो खेळताना नेहमी एक लाल रुमाल आपल्यासोबत घेऊन मैदानात उतरतो. शुभमनच्या या विश्वासामागे एक मनोरंजक कहाणी अशी आहे की त्याने एका अंडर-16 खेळात पांढरा रुमाल स्वतः जवळ ठेवला होता आणि या सामन्यात त्याने शतक ठोकले होते. त्याआधी तो कमी गुणांच्या स्ट्रिंगसह झगडत होता. पण, तो सफेद रुमाल खराब झाल्यामुळे त्याने एक लाल रंगाचा रुमाल उचलला आणि आणखी एक शतकपेक्षा अधिक धावा काढल्या. तेव्हापासून शुभमनचा 'हा' विश्वास कायम आहे.Happy Birthday Shubman Gill

4. वयाच्या18 वर्ष आणि 237 दिवसांमध्ये आयपीएलमध्ये अर्धशतक झळकावणारा गिल चौथा सर्वात लहान खेळाडू ठरला. त्याने चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध कोलकाता नाईट रायडर्सकडून 57 धावा केल्या होत्या. 19 वर्षांचा होण्यापूर्वी आयपीएलमध्ये अर्धशतक झळकावणाऱ्या पाच खेळाडूंपैकी शुभमन एक आहे पण चौथ्या किंवा त्याहून खालच्या क्रमांकावर फलंदाजी करताना असे करणारा तो पहिला फलंदाज आहे.

 

View this post on Instagram

 

Thank you everyone for the love and support. I’m so grateful for this experience!💜

A post shared by Ꮪhubman Gill (@shubmangill) on

5. शुभमनने भारतासाठी अंडर-19 विश्वचषकमध्ये दमदार खेळी केली होती. या स्पर्धेदरम्यान, शुभमनने भारत-पाकिस्तान अंडर-19 विश्वचषक सामन्यांमध्ये शतक केले. असे करणारा गिल हा एकमेव खेळाडू आहे. गिलसह फक्त तीन खेळाडूंनी पाकिस्तानविरुद्धच्या अंडर-19 विश्वचषकच्या इतिहासात शतक ठोकले. शुभमनच्या आधी कोणत्याही भारत वा पाक खेळाडूला सामन्यात शतक करण्यात यश आले नाही. शुभमनच्या आधी भारत विरुद्ध पाकिस्तान अंडर-19 सामन्यात सर्वात मोठा स्कोर करण्याचा रेकॉर्ड सलमान बट याच्या नावावर होता. बटने 2002 च्या अंडर-19 विश्वचषक सामन्यात 85 धावांची खेळी केली होती.

 

View this post on Instagram

 

#throwbackthursday

A post shared by Ꮪhubman Gill (@shubmangill) on

6. 2013-14 आणि 2014-15 मध्ये सलग सर्वोत्कृष्ट जुनिअर क्रिकेटपटूसाठी बीसीसीआयचा पुरस्कार शुभमनने जिंकला.

7. शुभमन हा अंडर-19 विश्वचषकातील एकमेव क्रिकेटपटू आहे ज्याने पाठोपाठ 6 वेळा पन्नास किंवा त्याहून अधिक धावा केल्या आहेत. यापूर्वी हा रेकॉर्ड मेहदी हसन मिराज याच्या नावावर होता. त्याने 50 पेक्षा अधिक धावा 4 वेळा केल्या होत्या.

8. अंडर-16 मध्ये देखील शुभमनची कामगिरी बघण्यासारखी आहे. वयाच्या फक्त 14 व्या वर्षी शुमनने U-16 सामन्यात 351 धावा फटकावल्या आणि निर्मल सिंह याच्याबरोबर 587 धावांची भागीदारी रचली. दरम्यान, अंडर-16 जिल्हा पातळीवर कोणत्याही खेळाडूने केलेल्या 'या' सर्वाधिक धावा आहेत.

9. शुभमन, सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) आणि सध्याच्या खेळाडूंपैकी विराट कोहली (Virat Kohli) यांना आदर्श मानतो. "साहजिकच, माझे सर्वात आवडते सचिन तेंडुलकर आहेत. जेव्हा मी क्रिकेट पाहण्यास सुरवात केली, तेव्हा ते एक लेजेंड होते, तो अजूनही आहेत आणि कायम राहतील. पण, आता माझा आवडता विराट कोहली आहे. मला त्याची शैली आवडते, तो दज्याप्रकारे दबावाखाली खेळतो ते मला आवडते. मी प्रयत्नाने त्याचे अनुकरण करू इच्छित आहे. ते खूप कठीणआहे," असे स्पोर्ट्सकिडाला सांगितले.

 

View this post on Instagram

 

With my idol 😍 😎👌 #bcciawards #juniorcricketeroftheyear 😁 @virat.kohli 👍 good luck for Australia tour 👍

A post shared by Ꮪhubman Gill (@shubmangill) on

10. त्याने तमिळनाडूविरुद्ध वयाच्या 19 वर्ष आणि 97 दिवसांत 268 धावा केल्या. रीतिंदर सिंह सोधी यांच्यानंतर पंजाबकडून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 200धावा करणारा तो दुसरा सर्वात युवा खेळाडू आहे. शिवाय, मोहालीच्या पीसीए स्टेडियमवर कोणत्याही खेळाडूने केलेली ही सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या आहे.