Happy Birthday Sachin: क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर करणार 46व्या वर्षात पदार्पण, सोशल मीडियावर फॅन्स असा साजरा करणार वाढदिवस
सचिन तेंडुलकर (Photo: Getty)

Sachin Tendulkar 46th Birthday Plans: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) चा वाढदिवस (Birthday)  म्हणजे क्रिकेट प्रेमींसाठी मोठा सोहळाच म्हणता येईल. उद्या म्हणजे 24 एप्रिलला (24th April) सचिन 46 व्या वर्षात पदार्पण करणार आहे. या निमित्ताने सचिनचा प्रत्येक फॅन हा आपापल्या परीने आपल्या लाडक्या 'गॉड ऑफ क्रिकेट' (God Of Cricket) ला शुभेच्छा द्यायला उत्सुक आहे.

सोशल मीडियावर या दिवशी सचिनच्या चाहत्या वर्गांच्या अकाउंट्सनी वेगवेगळ्या ऑनलाईन इव्हेंट्सचं आयोजन केलं आहे. पाकिस्तान संघाचा 'हा' खेळाडू सचिन तेंडूलकर ह्याच्याकडून वर्ल्ड कपसाठी सल्ला घेणार

कोणी गाण्याचे व्हिडीओ बनवून तर कोणी सचिनच्या फोटोंचा कोलाज बनवून सचिनचा वाढदिवस साजरा करण्याचं योजलं आहे, जाणून घेऊया नेमका काय आहेत सचिनच्या फॅन्स चे बर्थडे प्लॅन्स...

सर्वात मोठा सचिन फॅन

सचिनचा सगळ्यात मोठा फॅन कोण हे शोधण्यासाठी एका प्रशोत्तर स्पर्धेचं ऑनलाईन आयोजन करण्यात येणार आहे. या मोबाईल वर खेळता येणाऱ्या स्पर्धेच्या विजेत्याला सचिनच्या सहीचे गिफ्ट्स देण्यात येणार आहे.

सचिनसाठी कॉमन डीपी

सचिनने आजवर अनेक मॅचेस जिंकून आपल्याला आनंद साजरा करायची हजार कारण दिली आहेत, त्यामुळे त्याच्या वाढदिवसाला स्पेशल बनवण्यासाठी हा कॉमन डीपी तयार केल्याचे सांगणारा ट्विट सर्वत्र जोरदार व्हायरल होत आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने फॅन्स हा एकच फोटो आपला डीपी म्हणून ठेवणार आहेत.

फोटो आणि व्हिडिओचे कोलाज

सचिनच्या आजवरच्या अनेक फोटो एकत्र करून त्याला साजेसा म्युजिक विडिओ बनवण्यात आला आहे. विकास चोप्रा यांनी बनवलेलं हे सचिन तेंडुलकर वरचं गाणं नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरत आहे.

तुमचं आवडतं सचिनपर्व कोणतं?

#sachInnings या हॅशटॅग चा वापर करून सचिनच्या आजवरच्या आयुष्यातील स्वतःच्या आवडीच्या कोणत्या काळात जावंसं वाटेल हे फॅन्स शेअर करत आहेत. सचिनच्या वेगवेगळ्या मॅचेस पासून ते त्याच्या बालपणातल्या अनेक आठवणी या निम्मिताने सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत.

सचिनसाठी खास गाणं

आजवरच्या वेगवेगळ्या क्रिकेटच्या सामन्यांतील सचिनच्या खेळाचे व्हिडीओज एकत्र करून हे सात मिनिटांचं गाणं तयार करण्यात आलं आहे. सचिनच्या बर्थडेला ऑनलाईन प्रदर्शित करण्यात येणार आहे, त्याची ही छोटीशी झलक..

सचिनच्या वाढदिवस अवघ्या काहीच तासात येणार असल्याचं काऊंटडाऊन देखील त्याच्या चाहत्यांनी बनवलं आहे. आता या सगळ्या शुभेच्छा सचिन पर्यंत पोहचल्यावर त्याची प्रतिक्रिया काय असेल याबद्दल सगळ्यांना उत्सुकता लागली आहे.