विराट कोहली आणि रोहित शर्मा (Photo by Michael Steele/Getty Image)

गुरुवारी रोहित शर्मा (Rohit Sharma) 33 वर्षांचा झाला. एकदिवसीय आंतरराष्ट्रीय वनडे क्रिकेटमध्ये तीन दुहेरी शतक ठोकणाऱ्या जगातील एकमेव फलंदाजासाठी जगातील सर्व भागातून शुभेच्छाचा वर्षाव होत आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) ट्विटरवर व्हिडिओ पोस्ट केला आणि रोहितच्या कसोटी क्रिकेटमधील पदार्पणातील पहिली आठवण सांगितली. रोहितच्या 33 व्या वाढदिवसादिनी भारतीय कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) यानेही ट्विटरवर पोस्ट शेअर करून शुभेच्छा दिल्या. भारतीय क्रिकेटमधील आजवरच्या त्याच्या उत्कृष्ट योगदानाबद्दल क्रिकेट जगातील अनेक खेळाडूंनी त्याला सोशल मीडियावर शुभेच्छा दिल्या.रवि शास्त्री, अजिंक्य रहाणे, मयंक अग्रवाल, हनुमा विहारी यांनी 'हिटमॅन'ला खास शुभेच्छा देत सोशल मीडियावर पोस्ट शेअर केल्या. कोहलीने ट्वीट केले, "हॅप्पी बडे रोहित. देव तुला आरोग्य, आनंद आणि इतर अनेक उत्तम डाव देई. निरोगी रहा." (Rohit Sharma Birthday Special: रोहित शर्मा ने मुंबई इंडियन्सविरुद्ध घेतली होती हॅटट्रिक, फलंदाजीने नाही गोलंदाजीने टीमला बनवले होते चॅम्पियन Watch Video)

"वाढदिवसाच्या शुभेच्छा, हिटमॅन. रोहित शर्माच्या खास दिवशी, व्हाइसमध्ये हिटमॅन शोचा रिकॅप येथे आहे. हा डाव रोहितच्या आवडत्या मैदानातील एक कोलकाता मध्ये खेळला गेला."

विराट कोहली

"रोहित, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! आपणास आणि कौटुंबिक आरोग्यासाठी आणि या वाईट काळात आनंदाची शुभेच्छा. घरी रहा, सुरक्षित रहा, केक बेक करा," सुरेश रैनाने म्हटले.

खलील अहमद याने ट्वीट केले की, "मी ओळखत असलेल्यांपैकी तुम्ही सर्वांत छान आणि अस्सल लोकांपैकी आहात. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला."

"वाढदिवसाच्या शुभेच्छा, शर्माआ! पुढचे वर्ष चांगले जावो. आपणास आणि आपल्या कुटुंबाला आरोग्य आणि आनंदाच्या शुभेच्छा देत आहे," रवि शास्त्री म्हणाले.

मयंक अग्रवालनेही रोहितच्या शुभेच्छा दिल्या आणि त्याच्या पहिल्या कसोटी शतकाची क्रेडिट दिले.

अजिंक्य रहाणे

वासिम जाफर

श्रेयस अय्यर

शिवम दुबे

वनडेमध्ये सर्वाधिक वैयक्तिक धावा करण्याचा विक्रम रोहितच्या नावावर आहे. त्याने श्रीलंकाविरुद्ध 2014 च्या वनडे सामन्यात सर्वाधिक 264 धावांचा डाव खेळला होता. खेळाच्या तीनही स्वरूपात शतक ठोकणारा रोहित तीन भारतीय फलंदाजांपैकी एक आहे. हिटमनने आतापर्यंत 224 एकदिवसीय सामने खेळले आहेत. यात त्याने 29 शतकं आणि 43 अर्धशतकं ठोकली आहेत. 100 हुन अधिक टी-20 सामने खेळणारा रोहित पहिला भारतीय फलंदाज आहे. रोहितने आजवर108टी-20 सामन्यात 2773 धावा केल्या आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये रोहितची सरासरी 46 च्या वर आहे आणि त्याने 32 सामन्यांत 2141 धावा केल्या आहेत.