
टीम इंडियाचा 'हिटमॅन' रोहित शर्मा आज त्याचा 33 वा वाढदिवस साजरा करत आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विक्रमी फलंदाजी करणाऱ्या रोहितने आपल्या करिअरची सुरुवात एक गोलंदाज म्हणून केली. मात्र त्याच्या प्रशिक्षकाने त्याचे फलंदाजी कौशल्य ओळखले आणि त्याचे फलंदाज म्हणून रूपांतर केले. इंडियन प्रीमिअर लीगमध्ये (आयपीएल) रोहित अनेक वर्षांपासून मुंबई इंडियन्सचे नेतृत्व करत आहे. त्याच्या नेतृत्वात या टीमने सर्वाधिक आयपीएलचे विजेतेपद जिंकण्याचा पराक्रम केला आहे. पण, त्याचे चाहते आणि अन्य कोणालाही ही बाब माहिती नसेल की याच टीमविरुद्ध एकेकाळी रोहितने हॅटट्रिक घेतली होती. रोहितची आजवर्षी एकमेव हॅटट्रिक ठरली. 2009 मध्ये डेक्कन चार्जर्सकडून खेळत रोहितने मुंबई इंडियन्सविरुद्ध हॅट्ट्रिक घेतली आणि टीमला फलंदाजीने नाही तर गोलंदाजीद्वारे चॅम्पियन बनण्यात महत्वाची भूमिका बजावली. (Rohit Sharma Birthday Special: हॅटट्रिक घेण्यापासून IPL जिंकण्यापर्यंत भारतीय क्रिकेटचा ‘हिटमॅन’ रोहित शर्मा विषयी 5 आश्चर्यकारक तथ्ये, जाणून घ्या)
2009मध्ये इंडियन टी-20 लीगचा दुसरा हंगाम खेळला होता. मुंबई इंडियन्सविरुद्ध 16 व्या ओव्हरमध्ये रोहित गोलंदाजी करायला आला. ओव्हरच्या पाचव्या चेंडूवर रोहितने अभिषेक नायर आणि सहाव्या चेंडूवर हरभजन सिंहला माघारी पाठवले. त्यानंतर 18 व्या ओव्हरच्या पाचव्या चेंडूवर हिटमॅनने तळ ठोकून असलेल्या अनुभवी जेपी डुमिनीला बाद केले आणि हॅटट्रिक पूर्ण केली. रोहितच्या या हॅटट्रिकमुळे मुंबई टीमला तो सामना गमवावा लागला. पाहा रोहितच्या त्या पराक्रमाचा व्हिडिओ:
रोहितने या संपूर्ण डावात 2 ओव्हरमध्ये 6 धावा देऊन 4 गडी बाद केले. त्यापूर्वी फलंदाजीने त्याने 38 धावांचे योगदानही दिले. दरम्यान, 2009 मध्ये अॅडम गिलक्रिस्टच्या नेतृत्वात डेक्कन चार्जर्सने विजेतेपदावर आपले नाव लिहिले. आणि रोहित एकमात्र खेळाडू आहे जो 5 वेळा आयपीएल जेतेपद जिंकणाऱ्या टीमचा सदस्य राहिला आहे. 2013, 2015, 17 19 च्या हंगामात च्या हंगामात मुंबई इंडियन्सचे प्रतिनिधित्व करताना रोहितने आयपीएल विजेतेपदाची चव चाखली.