Happy Birthday Ricky Ponting: ऑस्ट्रेलियाचा (Australi) सर्वात यशस्वी आंतरराष्ट्रीय कर्णधार रिकी पॉन्टिंग (Ricky Ponting) यांचा आज 46वा वाढदिवस आहे. त्यांचे रेकॉर्ड देखील दर्शवतात की ते सर डोनाल्ड ब्रॅडमन यांच्यानंतर ऑस्ट्रेलियाचे महान फलंदाज आहेत. 18 वर्षांच्या कारकीर्दीत, कांगारू फलंदाजाने एकदिवसीय आणि कसोटी, अशा क्रिकेटच्या दोन्ही फॉरमॅटमध्ये 13,000 हुन अधिक धावांसह 71 आंतरराष्ट्रीय शतकं केली आहेत, जे सचिन तेंडुलकरच्या शंभर शतकानंतर दुसऱ्या सर्वाधिक आहेत. दरम्यान, पॉन्टिंग सध्या भारत-ऑस्ट्रेलिया पहिल्या कसोटी सामन्यात 'चॅनेल 7' साठी कमेंट्री करत आहेत. अॅडिलेड ओव्हलमधील (Adelaide Oval) सामन्याच्या तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरु होण्यापूर्वी भारताचे माजी दिग्गज आणि 'लिटिल-मास्टर' सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) यांनी ऑस्ट्रेलियन 'पंटर'ला वाढदिवसाची खास भेट दिली.
गावस्कर यांनी बर्थडे गिफ्ट म्हणून पॉन्टिंगला खास 'सनी ग्रीन' कॅप भेट दिली. ऑस्ट्रेलियाच्या 'चॅनेल 7' गावस्कर यांनी पॉन्टिंगचा कॅप भेट देतानाचा फोटो शेअर केला. यामध्ये दोन्ही दिग्गज कर्णधार हातात कॅप घेऊन फोटोसाठी पोज करताना दिसत आहे. 2012मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेल्या पॉन्टिंगच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलियाने 2003 आणि 2007 मध्ये दोन वर्ल्ड कप जिंकण्याचा पराक्रम केला आहे. गावस्कर यांनी पॉन्टिंगला दिलेली गिफ्टवर एक नजर टाका...
🎂 Happy birthday to @RickyPonting!
Sunil Gavaskar had a special 'Sunny Green' cap as a present #AUSvIND pic.twitter.com/DzgvB9Epx6
— 7Cricket (@7Cricket) December 19, 2020
दरम्यान, पॉन्टिंग क्रिकेट विश्वातील सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक आहे आणि त्याने 77 कसोटींमध्ये 62.3 टक्के विजय मिळवला. पॉन्टिंग ऑस्ट्रेलियाचा वनडेमधील सर्वात यशस्वी कर्णधार असण्याबाबत शंका नाही. दोन वर्ल्ड कप जिंकण्याऐवजी त्याने 230 वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियाचे कर्णधार म्हणून नेतृत्व केले असून त्याची विजयी टक्केवारी 76.14 इतकी आहे. 1995 मध्ये पाँटिंगने कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले असून 100 हुन अधिक कसोटी जिंकणारा तो इतिहासातील पहिला क्रिकेटर आहे. ऑस्ट्रेलियाकडून सर्वाधिक कसोटी खेळण्याच्या यादीत पॉन्टिंग स्टीव्ह वॉ संयुक्तपणे अव्वल स्थानी आहेत. दोघांनी 168 कसोटी सामने खेळले आहेत.