राहुल द्रविड (Photo Credits: File Image)

Happy Birthday Rahul Dravid: भारतीय क्रिकेट संघाच्या फलंदाजीची भिंत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राहुल द्रविडचा (Rahul Dravid) आज 48वा वाढदिवस आहे. 11 जानेवारी 1973 रोजी मध्य प्रदेशच्या इंदोर (Indore) येथे राहुलचा जन्म झाला. भारताच्या अनुभवी खेळाडूंपैकी राहुलने 16 वर टीम इंडियाचे (Team India) प्रतिनिधित्व केले आणि 2012 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकला. 2005 मध्ये द्रविडला कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आणि 2007 मध्ये त्यांनी पदाचा राजीनामा दिला. आपल्या 16 वर्षाच्या मोठ्या क्रिकेट कारकिर्दीत राहुलने मैदानावरील प्रभावी कामगिरी, नम्र आणि मोहक व्यक्तिमत्त्वाने जगभरातील चाहत्यांचे मन जिंकले आहेत. द्रविड अत्यंत शांत पण गंभीर स्वभावाचा खेळाडू आहे. मैदानावर कशीही स्थिती कसो राहुल नेहमीच आपल्या शांत पण आक्रमक अंदाजात खेळताना दिसला आहे. तुम्ही कदाचितच द्रविडला कोणत्याही वादात अडकलेले पहिले असेल. राहुल हा एकमेव खेळाडू आहे जो पदार्पणाच्या टी-20 सामन्यातच निवृत्त झाला. चक्रावलात ना? पण, हे खरं आहे. (IND vs AUS 2020-21: SCG मध्ये टीम इंडियाचा 'द वॉल' राहुल द्रविडने एक धाव घेताच प्रेक्षकांनी उभं राहून वाजवल्या होत्या टाळ्या, पहा Video)

दरम्यान, 'द वॉल'च्या 48व्या वाढदिवसानिमित्त आपण द्रविडबद्दल अशाच कमी माहित असलेल्या रंजक गोष्टींबद्दल जाणून घेणार आहोत.

1. द्रविडचे वडिल किसन फॅक्टरीमध्ये काम करायचे जे स्वादिष्ट जॅम बनवण्यासाठी प्रसिद्ध आहे, यामुळे त्याला 'जॅमी' हे टोपणनाव मिळाले. द्रविडने किसा नच्या एका जाहिराती मधेही काम केले आहे.

2. कसोटी क्रिकेट खेळणाऱ्या देशांविरुद्ध शतक झळकावणारा द्रविड जगातील एकमेव खेळाडू आहे. 2004 मध्ये बांगलादेश विरुद्ध चटगांव येथे शतकी खेळीसह त्याने ही आश्चर्यकारक कामगिरी केली.

3. 2004 मध्ये आयसीसी पुरस्कारांची सुरूवात झाली तेव्हा द्रविडने आयसीसीचा सर्वोत्कृष्ट कसोटीपटू आणि वर्षातील सर्वोत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार जिंकला होता. ही आजवरची त्याची सर्वात मोठी कामगिरी आहे.

4. 1999 मध्ये इंग्लंडमध्ये सातव्या वर्ल्ड कप स्पर्धेत द्रविडने सर्वाधिक 461 धावा फटकावल्या. यासह कसोटी फलंदाज असल्याचा आग्रह धरलेल्या लोकांना द्रविडने एक उत्तम प्रतिसाद दिला.

5. माजी कर्णधार सौरव गांगुलीप्रमाणे राहुल देखी क्रिकेटपूर्वी अन्य खेळच खेळायचा. द्रविड कर्नाटक राज्य संघाकडून हॉकी खेळला आहे.

6. ‘द वॉल’ द्रविडने कसोटी सामन्याच्या चौथ्या डावात भरपूर धावा केल्या आहेत. त्याने कसोटी क्रिकेटच्या चौथ्या डावात 40.84 च्या सरासरीने एकूण 1552 धावा केल्या आहेत, तर तो 56 डावांमध्ये 18 वेळा नाबाद राहिला आहे. या दरम्यान त्याने 1 शतक देखील झळकावले आहे.

7. दक्षिण आफ्रिकामध्ये भारताला कसोटी विजय मिळवून देणारा राहुल पहिला कर्णधार आहे. 2006 मध्ये जोहान्सबर्ग द्रविडच्या नेतृत्वात टीम इंडियाने 123 धावांनी विजय मिळविला होता.

8. सुनील गावस्कर आणि सचिन तेंडुलकर यांच्यानंतर कसोटी क्रिकेटमध्ये 10,000 हजार धावा करणारा द्रविड फक्त तिसरा भारतीय क्रिकेटर आहे. द्रविडनंतर एकही फलंदाजी टेस्टमध्ये दहा हजारी आकडा पार करू शकलेला नाही.

9. द्रविड क्रिकेट इतिहासातील एकमेव असा खेळाडू आहे जो पदार्पणाच्या सामन्यातच निवृत्त झाला. द्रविडने 2011 इंग्लंडविरुद्ध टी-20 डेब्यू केले होते. त्याने पहिला सामना खेळण्यापूर्वीच निवृत्ती जाहीर केली होती.

10. कसोटी क्रिकेटमध्ये खेळाडूने घेतलेल्या सर्वाधिक झेलचा वर्ल्ड रेकॉर्ड राहुलच्या नावावर आहे. राहुलने टेस्ट करिअरमध्ये खेळाडू म्हणून सर्वाधिक 182 कॅच पकडले आहेत.

ऑस्ट्रेलियाच्या 2011-12 दौऱ्यानंतर 9 मार्च 2012 रोजी द्रविडने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. त्यानंतर, राहुल द्रविडने आपल्या अनुभवाचा उपयोग देशातील युवा क्रिकेटपटूंचे मार्गदर्शन केले. त्याने अंडर-19 संघाला प्रशिक्षण दिले ज्याचा फायदा संघाला झाला आणि भारताने 2018 वर्ल्ड कप विजेतेपद पटकावले. द्रविड 2020 पर्यंत संघाच्या प्रशिक्षकपदी कायम होते.