(Photo Credits: Instagram)

टीम इंडियाचा अनुभवी विकेटकीपर बॅट्समन महेंद्र सिंग धोनी रविवारी म्हणजेच 7 जुलैला 38 वर्षांचा होणार आहे. या वयातही त्याची चपळता युवा खेळाडूंना प्रेरणा देणारी आहे. धोनी कर्णधार असताना भारतीय संघाने यशाची अनेक नवनवीन शिखरे सर केली. मैदानावरील आपल्या शांत वृत्तीमुळे त्याला 'कॅप्टन कूल' म्हटले जाते. 2004 मध्ये धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि गेले दशकभर धोनी टीम इंडियाचा अविभाज्य भाग राहिला आहे. (IND vs SL मॅचआधी ICC ने शेअर केला एम एस धोनीसाठी स्पेशल व्हिडिओ, विराट कोहली सह या खेळाडूंनी केली प्रशंसा)

आपल्या क्रिकेट करिअर दरम्यान धोनीने मैदानावर आणि मैदानाबाहेर अनेकांची मनं जिंकली. पण, त्याच्यात एक प्रेमळ पितासुद्धा लपला आहे. 2015 विश्वचषक दरम्यान धोनीची लेक, झिवा हिचा जन्म झाला. तेव्हा धोनी ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड आयोजित केलेले विश्वकप खेळण्यात व्यस्त होता. धोनी आपल्या करिअरप्रमाणेच वैयक्तिक आणि कौटुंबिक आयुष्यालाही तितकेच प्राधान्य देतो. आपली लेक, झिवाच्या जन्मानंतर धोनीने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर कित्येक व्हिडिओज, फोटोज शेअर केले आहेत. आणि ते पाहून तुम्ही देखील भावून व्हाल.

 

View this post on Instagram

 

Even better when we are dancing @zivasinghdhoni006

A post shared by M S Dhoni (@mahi7781) on

 

View this post on Instagram

 

Greetings in two language

A post shared by M S Dhoni (@mahi7781) on

 

View this post on Instagram

 

Very smart

A post shared by M S Dhoni (@mahi7781) on

 

View this post on Instagram

 

Dances better than the father atleast

A post shared by M S Dhoni (@mahi7781) on

 

View this post on Instagram

 

Game over, had a nice sleep now back to Daddy’s duties

A post shared by M S Dhoni (@mahi7781) on

आयपीएल असो किंवा वनडे सामना, झिवा आपल्या पप्पाला दरवेळी जोशात चिअर अप करताना दिसते. आज धोनीच्या वाढदिवस निमित्त आपण बघूया धोनी आणि झिवाचे काही हृदयस्पर्शी क्षण: