Happy Birthday M S Dhoni : एम एस धोनीला चाहत्याकडून अनोख्या शुभेच्छा, गिफ्ट बघून तुम्हीही व्हाल थक्क!
mahendra singh dhoni

कॅप्टन कुल एम एस धोनीला (M S Dhoni) फक्त भारतीयचं नाही तर आंतरराष्ट्रीय (International) देखील मोठा चाहता वर्ग आहे. माहीचे करोडो फॅन्स (Fans) कायमच माहीवर भरभरुन प्रेम करताना दिसतात. 7 जुलैला धोनी वयाचे 41 वर्ष पूर्ण करुन 41 व्या वर्षात पदार्पण करणार आहे. गेल्या आठवड्याभरापासून धोनीचा बर्थडे Birthday) वीक म्हणून धोनीचे फॅन्स सेलिब्रेट (Celebrate) करताना दिसत आहे. विविध स्तरातून धोनीवर  शुभेच्छांचा वर्षाव होतो आहे. धोनीचे अनेक चाहते असतील पण आंध्र प्रदेशामधील (Andhra Pradesh) विजयवाड्यातील (Vijaywada) धोनीच्या एका फॅनने आपल्या लाडक्या माही भाईला अशा काही शुभेच्छा दिल्या आहेत की ते बघुन तुम्हीही थक्क व्हाल.

 

धोनीच्या या चाहत्याने एम एस धोनीचं 41 फूट उंच कट आउट (Cut Out) साकारत कॅप्टन कुलला (CaptainCool) वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. माहीचा हा 41 वा वाढदिवस असल्याने या चाहत्याने माहीचा 41 फुटाचा (Feet) कटआउट बनवत धोनी प्रती आपलं प्रेम व्यक्त केलं आहे. महेद्रसिंह धोनीचा हा कटआउट सध्या सोशल मिडीयावर (Social Media) चर्चेचा विषय ठरला आहे. कटआउटचा फोटो जोरदार व्हायरल होताना दिसत आहे. ( हे ही वाचा:-M S Dhoni Wedding Anniversary: एम एस धोनी आणि पत्नी साक्षीच्या लग्नाचा आज वाढदिवस, सोशल मिडीयावर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव!)

 

महेंद्रसिंह धोनी (Mahendra Singh Dhoni) आणि पत्नी साक्षीने (Sakshi Dhoni) दोन दिवसापूर्वीचं त्यांच्या लग्नाचा बारावा वाढदिवस साजरा केला. धोनी गेल्या आठवड्यात त्याच्या  कुटुंबासोबत  लंडनला (London) रवाना झाला असुन तो त्याचा वाढदिवस  लंडनमध्ये साजरा करणार असल्याची शक्यता आहे. फॅन फॉलोविंग (Fan Following) असावी तर एम एस डी सारखी असं म्हणत विजयवाड्याच्या या फॅनने साकारलेल्या 41 फुट कट आउटला जोरदार पसंती मिळत आहे. तसे तर जगभरात धोनीचे फॅन्स आहेत पण गेल्या 14 वर्षापासून माही CSK साठी खेळतो तर यापैकी त्याने चारदा चेन्नई सुपर किंग्सला (Chennai Super Kings) विजयाचा मानकरी बनवलं आहे. त्यामुळे धोनी जरी झारखंडचा (Jharkhand) मुळ रहिवासी असला तर साउथ  इंडियामध्ये (South India) एम एस धोनी विषयी विशेष प्रेम आहे आणि तेच प्रेम या विजवाड्याच्या तरुणाने साकारलेल्या कट आउट मधून दिसून येत आहे.