लुईस मॅकमॅनस आणि लॉरी इव्हान्स (Photo Credit: Vitality Blast/Twitter)

भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी (Mahendra Singh Dhoni) हा जगातील सर्वोत्तम मॅचफिनिशरपैकी एक क्रिकेटपटू आहे. टी-20 मध्ये आपल्या यष्टीरक्षक आणि फलंदाजीने भारतीय संघाला कित्येक सामने जिंकून दिले आहे. मात्र, यंदाच्या क्रिकेट विश्वचषकमधील त्याच्या निराशाजनक खेळीनंतर त्याने खेळातून निवृत्त व्हावे असे म्हटले जात आहे. वयाच्या 37 व्या वर्षीय धोनीची स्टम्प्सच्या मागील त्याची चपळता कोणाही युवा यष्टिरक्षकासाठी लज्जास्पद आहे. धोनी हा जगातील चपळ यष्टिरक्षकांपैकी एक समजला जातो. आजवर अनेक विकेटकीपरांनी धोनीसारखी चपळता दाखवत फलंदाजाला धावबाद करण्याचे प्रयत्न केले आहे. काहींना यश मिळाले तर काही अजून प्रयत्न करत आहे. इंग्लंडमधील क्रिकेट विश्वचषकनंतर सध्या त्यांच्या लोकांना वेड लागले आहे ते वाइटैलिटी टी-20 ब्लास्टचे (Vitality Blast).

दरम्यान, या इंग्लिश टी-20 लीगच्या एका सामन्यात हॅम्पशायरचा (Hampshire) विकेटकीपर लुईस मॅकमॅनस (Lewis McManus) याने स्टम्प्सच्या मागे चपळता दाखवत धोनीचीच आठवण करून दिली. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. काल ससेक्स (Sussex) विरुद्ध हॅम्पशायर सामन्यादरम्यान हॅमशायरचा गोलंदाज मेसन क्रेन (Mason Crane) याने ससेक्सच्या लॉरी इव्हान्स (Laurie Evans) याला टाकलेला चेंडू सरळ विकेटकीपर मॅकमॅनसकडे गेला आणि त्याने चतुराई दाखवत फलंदाजाला धावबाद केले. सामन्यादरम्यान अशी विकेट बहुल सर्व उपस्थित खेळाडूंसह प्रेक्षक देखील आश्चर्यचकित झाले. अशा असामान्यपाने आऊट झाल्याने फलंदाजाला देखील विश्वास बसला नाही आणि तो काही वेळ खेळपट्टीवरच उभा राहिला. पण पंचांनी आऊट घोषित केल्यावर त्याला मैदानसोडून जावे लागले. पहा हा रोमांचक व्हिडिओ:

धोनीच्या विकेटकीपिंग कौशल्यावर आणि त्याच्या चातुर्यावर क्रिकेटविश्वाच तर संपूर्ण जग विश्वास ठेवतं. दुसरीकडे, सामन्याबद्दल बोलताना ससेक्सने प्रथम फलंदाजी करत हॅम्पशायर संघाला 188 धावांचे आव्हान दिले. या धावांचा पाठलाग करत संपूर्ण हॅम्पशायर संघ 174 धावांवर बाद झाला. आणि ससेक्सने 14 धावांनी विजय मिळवला. ससेक्ससाठी रीस टॉपले (Reece Topley) याने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या आणि हॅम्पशायरच्या फलंदाजांच्या नाकी-नऊ आणले.