
Gujarat vs Kerala Semifinal 2 Ranji Trophy 2025 Live Streaming: रणजी ट्रॉफी एलिट 2024-25 चा पहिला सेमीफायनल गुजरात आणि केरळ (Gujarat vs Kerala) यांच्यात अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियम (Narendra Modi Stadium) ए ग्राउंडवर खेळला जात आहे. या सामन्यात केरळने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. पहिल्या दिवसाच्या अखेरीस केरळने 89 षटकांत 4 गडी गमावून 206 धावा केल्या होत्या. कर्णधार सचिन बेबी 69 धावांवर नाबाद आहे. अक्षय चंद्रन 30 धावा काढून बाद झाला. रोहन कुन्नुमल 30 धावा काढून बाद झाला आणि जलज सक्सेना 30 धावा काढून बाद झाला. गुजरातकडून अर्जन नागवासवाला, प्रियजितसिंग जडेजा आणि रवी बिश्नोई यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला. दुसऱ्या दिवसाचा खेळ दोन्ही संघांसाठी खूप महत्त्वाचा असेल. केरळ मोठ्या धावसंख्येवर लक्ष केंद्रित करेल. (GT W vs MI W WPL 2025 Live Streaming: महिला प्रीमियर लीगमध्ये आज गुजरात जायंट्स आणि मुंबई इंडियन्स आमनेसामने; कधी, कुठे आणि कसे लाईव्ह टेलिकास्ट पहाल?)
सामना कधी खेळला जाईल?
गुजरात आणि केरळ यांच्यातील रणजी ट्रॉफी एलिट 2024-25 च्या पहिल्या उपांत्य फेरीच्या दुसऱ्या दिवशीचा सामना आज सकाळी 9.30 वाजता सुरू झाला.
सामना कुठे पहाल?
गुजरात आणि केरळ यांच्यातील रणजी ट्रॉफी एलिट 2024-25 च्या पहिल्या उपांत्य फेरीच्या दुसऱ्या दिवसाचा सामना भारतात टीव्हीवर प्रसारित केला जात नाही. जिओ हॉटस्टार अॅप आणि वेबसाइटवर लाईव्ह स्ट्रीमिंग उपलब्ध आहे.
दोन्ही संघांचे खेळाडू
गुजरात: प्रियांक पांचाळ, आर्या देसाई, सिद्धार्थ देसाई, मनन हिंगराजिया, जयमीत पटेल, उर्विल पटेल (यष्टीरक्षक), चिंतन गजा (कर्णधार), विशाल जयस्वाल, रवी बिश्नोई, अर्जन नागवासवाला, प्रियजितसिंग जडेजा.
केरळ: अक्षय चंद्रन, रोहन कुन्नम्मल, सचिन बेबी (कर्णधार), जलज सक्सेना, सलमान निजार, वरुण नयनार, मोहम्मद अझरुद्दीन (यष्टीरक्षक), आदित्य सरवते, अहमद इम्रान, एमडी निधीश, नेदुमकुझी बेसिल.