
Gujarat Giants Women vs Mumbai Indians Women 5th Match, WPL 2025 Live Streaming: महिला प्रीमियर लीगचा पाचवा सामना आज म्हणजे 18 फेब्रुवारी रोजी गुजरात जायंट्स महिला आणि मुंबई इंडियन्स महिला (GT W vs MI W) यांच्यात खेळला जाणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना वडोदऱ्यातील कोटाम्बी स्टेडियमवर (Kotambi Stadium) खेळला जाईल. गुजरातचा हा तिसरा सामना आहे. गुजरातला पहिल्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. पण दुसऱ्या सामन्यात यूपीला हरवून त्यांनी आपले विजयी खाते उघडले. दुसरीकडे, मुंबई इंडियन्सने आतापर्यंत एक सामना खेळला आहे. ज्यामध्ये त्यांना दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला. दोन्ही संघांची फलंदाजी क्रम मजबूत आहे. अशा परिस्थितीत आपल्याला एक रोमांचक सामना पाहायला मिळेल. गुजरात जायंट्सचे नेतृत्व अॅशले गार्डनर करणार आहे. तर मुंबई इंडियन्सची कमान हरमनप्रीत कौरकड असेल.
गुजरात जायंट्स महिला आणि मुंबई इंडियन्स महिला यांच्यातील 5वा सामना कधी खेळला जाईल?
गुजरात जायंट्स महिला आणि यूपी वॉरियर्स महिला यांच्यातील महिला प्रीमियर लीग 2025 चा तिसरा सामना मंगळवारी 18 फेब्रुवारी रोजी भारतीय वेळेनुसार सायंकाळी 7.30 वाजता कोटाम्बी स्टेडियम, वडोदरा येथे खेळला जाईल.
गुजरात जायंट्स महिला आणि मुंबई इंडियन्स महिला यांच्यातील 5वा सामना कुठे पाहायचा?
गुजरात जायंट्स महिला आणि मुंबई इंडियन्स महिला यांच्यातील महिला प्रीमियर लीग 2025 चा पाचवा सामना भारतातील स्टार स्पोर्ट्स आणि स्पोर्ट्स 18 वाहिन्यांवर थेट प्रक्षेपित केला जाईल. याशिवाय, तुम्ही जिओ हॉटस्टार अॅप आणि वेबसाइटवर लाईव्ह स्ट्रीमिंग पाहू शकता.
दोन्ही संघांचे खेळाडू
गुजरात जायंट्स महिला संघ: बेथ मुनी (विकेटकीपर), अॅशले गार्डनर (कर्णधार), लॉरा वोल्वार्ड्ट, दयालन हेमलता, हरलीन देओल, डिआंड्रा डॉटिन, सिमरन शेख, तनुजा कंवर, सायली सतघरे, काशवी गौतम, प्रिया मिश्रा, मेघना सिंग, डॅनिएल गिब्सन, फोबी लिचफिल्ड, मन्नत कश्यप, शबनम मोहम्मद शकील, प्रकाशिका नाईक, भारती फुलमाली.
मुंबई इंडियन्स महिला संघ: यास्तिका भाटिया (विकेटकीपर), हरमनप्रीत कौर (कर्णधार), हेली मॅथ्यूज, नॅट सायव्हर-ब्रंट, अमेलिया केर, सजीवन सजना, अमनजोत कौर, संस्कृती गुप्ता, जिंतीमणी कलिता, शबनीम इस्माईल, साईका इशाक, कीर्तन बालकृष्णन, क्लो ट्रायॉन, पारुनिका सिसोदिया, अमनदीप कौर, जी कमलिनी, अक्षिता माहेश्वरी, नदीन डी क्लार्क.