PC-X

Gujarat Titans vs Punjab Kings IPL 2025 Live Streaming: इंडियन प्रीमियर लीग 2025 चा पाचवा सामना आज गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात खेळला जाणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाईल. शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली, गुजरात टायटन्सने एक संतुलित संघ तयार केला आहे. ज्यामध्ये जोस बटलर, साई सुदर्शन, ग्लेन फिलिप्स आणि रशीद खान यांचा समावेश आहे. दुसरीकडे, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील पंजाब किंग्जकडे एक मजबूत संघ आहे. ज्यामध्ये प्रभसिमरन सिंग, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टोइनिस, शशांक सिंग आणि मार्को जानसेन सारखे अनुभवी खेळाडू आहेत. ज्यांच्याकडे एकट्याने सामना जिंकण्याची ताकद आहे. दोन्ही संघांना 2024 मधील कामगिरी विसरून या हंगामात चांगली कामगिरी करायची आहे. अशा परिस्थितीत, एक रोमांचक सामना अपेक्षित आहे.

गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्ज यांच्यातील सामना कधी आणि कुठे खेळला जाईल?

गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्ज यांच्यातील आयपीएल 2025 चा पाचवा सामना आज म्हणजे 24 मार्च रोजी विशाखापट्टणम येथील डॉ. वाय.एस. स्टेडियमवर खेळला जाईल. हा सामना राजशेखर रेड्डी एसीए-व्हीडीसीए क्रिकेट स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता खेळला जाईल.

गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्ज यांच्यातील सामना तुम्ही कोणत्या टीव्ही चॅनेलवर पाहू शकता?

दिल्ली कॅपिटल्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यातील आयपीएल 2025 चा चौथा सामना स्टार स्पोर्ट्स चॅनेलवर पाहता येईल.

गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्ज यांच्यातील सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग कुठे उपलब्ध असेल?

गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्ज यांच्यातील आयपीएल 2025 चा पाचवा सामना JioHotstar अॅपवर ऑनलाइन पाहता येईल.

गुजरात टायटन्स संघ: जोस बटलर (यष्टीरक्षक), शुभमन गिल (कर्णधार), साई सुदर्शन, ग्लेन फिलिप्स, शाहरुख खान, वॉशिंग्टन सुंदर, राहुल तेवतिया, रशीद खान, रविश्रीनिवासन साई किशोर, कागिसो रबाडा, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, इशांत शर्मा, जयंत यादव, महिपाल लोमरोर, करीम जनत, कुलवंत खेजरोलिया, अनुज रावत, गेराल्ड कोएत्झी, शेरफेन रदरफोर्ड, मानव सुथार, कुमार कुशाग्र, अर्शद खान, गुरनूर ब्रार, निशांत सिंधू.

पंजाब किंग्ज संघ: जोश इंग्लिस (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर (कर्णधार), प्रभसिमरन सिंग, ग्लेन मॅक्सवेल, नेहल वधेरा, मार्कस स्टोइनिस, शशांक सिंग, मार्को जॉन्सन, हरप्रीत ब्रार, अर्शदीप सिंग, युजवेंद्र चहल, विजयकुमार विशाख, प्रवीण दुबे, लॉकी फर्ग्युसन, झेवियर बार्टलेट, विष्णू विनोद, यश ठाकूर, आरोन हार्डी, अजमतुल्ला उमरझाई, कुलदीप सेन, प्रियांश आर्य, सूर्यांश शेडगे, हरनूर सिंग, मुशीर खान, पायला अविनाश