MI vs GT (Photo Credit - X)

Gujarat Titans vs Mumbai Indians: आयपीएल 2025  (IPL 2025) नववा सामना गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स (Gujarat Titans vs Mumbai Indians) यांच्यात खेळवला जाणार आहे. हा सामना नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद (Narendra Modi Stadium, Ahmedabad) येथे संध्याकाळी 7.30 सुरु होईल. गुजरात टायटन्सला पंजाबविरुद्ध पहिला सामना गमवावा लागला आहे. तर मुंबई इंडियन्सला चेन्नईविरुद्ध पहिल्या सामन्यात पराभव स्वीकारावा लागला आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत, दोन्ही संघ आपल्या पहिल्या विजयासाठी उत्सुक असणार आहे. म्हणूनच आजचा सामना मनोरंजक असेल. गुजरातचे कर्णधारपद शुभमन गिलकडे आहे. तर, मुंबईची कमान हार्दिक पांड्याकडे आहे.

हेड टू हेड रेकॉर्ड (MI vs GT Head to Head)

आयपीएलच्या इतिहासात गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात एकूण पाच सामने खेळले गेले आहेत. या काळात, गुजरात टायटन्सने वरचढ कामगिरी केली आहे. गुजरात टायटन्सने तीन सामने जिंकले आहेत. तर, मुंबई इंडियन्सने फक्त दोन सामने जिंकले आहेत. गेल्या हंगामात दोन्ही संघांमध्ये फक्त एकच सामना खेळला गेला होता आणि हा सामना गुजरात टायटन्सने सहा धावांनी जिंकला होता. मुंबई इंडियन्स यावेळी पुनरागमन करू इच्छितात. (हे देखील वाचा: GT vs MI Dream11 Predication: रोहित की बटलर कोणाला बनवणार कर्णधार? असा तयार करा तुमचा सर्वोत्तम ड्रीम 11 संघ)

सर्वांच्या नजरा असतील 'या' दिग्गज खेळाडूंवर

शुभमन गिल: गुजरात टायटन्सचा कर्णधार आणि स्फोटक फलंदाज शुभमन गिलने गेल्या 10 सामन्यांमध्ये 379 धावा केल्या आहेत. यादरम्यान, शुभमन गिलने 179.32 च्या स्फोटक स्ट्राईक रेटने धावा केल्या आहेत. शुभमन गिलची आक्रमक फलंदाजी एसआरएचसाठी गेम चेंजर ठरू शकते.

जोस बटलर: गुजरात टायटन्सचा स्फोटक फलंदाज जोस बटलरने 349 धावा केल्या आहेत. या काळात जोस बटलरने 61 च्या सरासरीने धावा केल्या आहेत. जर जोस बटलर स्थिरावला तर तो विरोधी गोलंदाजांसाठी मोठ्या समस्या निर्माण करू शकतो.

रशीद खान: गुजरात टायटन्सचा घातक गोलंदाज रशीद खानने गेल्या आठ सामन्यांमध्ये आतापर्यंत 14 विकेट्स घेतल्या आहेत. या काळात, रशीद खानने 7.44 च्या इकॉनॉमीने गोलंदाजी केली आहे. डेथ ओव्हर्समध्ये रशीद खानची गोलंदाजी विरोधी संघांचे कंबरडे मोडू शकते.

रोहित शर्मा: रोहित शर्माने आतापर्यंत सीएसके विरुद्ध 34 सामन्यांमध्ये एकूण 896 धावा केल्या आहेत. रोहित शर्माला 1000 चा आकडा गाठण्यासाठी फक्त 104 धावांची आवश्यकता आहे. जर रोहित शर्मा मैदानावर राहिला तर तो एकाच सामन्यात हा आकडा गाठू शकतो.

सूर्यकुमार यादव: मुंबई इंडियन्सचा घातक फलंदाज सूर्यकुमार यादवने गेल्या 10 डावांमध्ये 381 धावा केल्या आहेत. यादरम्यान, सूर्यकुमार यादवने 161.59 च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या आहेत. सूर्यकुमार यादवचे शानदार टायमिंग आणि क्लासिक फटके सामना मुंबई इंडियन्सच्या बाजूने वळवू शकतात.

ट्रेंट बोल्ट: मुंबई इंडियन्सचा स्टार गोलंदाज ट्रेंट बोल्टने गेल्या नऊ सामन्यांमध्ये 13 विकेट्स घेतल्या आहेत. ट्रेंट बोल्टची अचूक गोलंदाजी फलंदाजांना त्रास देऊ शकते.