GT vs MI Dream11 Predication: रोहित की बटलर कोणाला बनवणार कर्णधार? असा तयार करा तुमचा सर्वोत्तम ड्रीम 11 संघ
गुजरात टायटन्सला पंजाबविरुद्ध पहिला सामना गमवावा लागला आहे. तर मुंबई इंडियन्सला चेन्नईविरुद्ध पहिल्या सामन्यात पराभव स्वीकारावा लागला आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत, दोन्ही संघ आपल्या पहिल्या विजयासाठी उत्सुक असणार आहे. म्हणूनच आजचा सामना मनोरंजक असेल. गुजरातचे कर्णधारपद शुभमन गिलकडे आहे. तर, मुंबईची कमान हार्दिक पांड्याकडे आहे.
Gujarat Titans vs Mumbai Indians: आयपीएल 2025 (IPL 2025) नववा सामना गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स (Gujarat Titans vs Mumbai Indians) यांच्यात खेळवला जाणार आहे. हा सामना नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद (Narendra Modi Stadium, Ahmedabad) येथे संध्याकाळी 7.30 सुरु होईल. गुजरात टायटन्सला पंजाबविरुद्ध पहिला सामना गमवावा लागला आहे. तर मुंबई इंडियन्सला चेन्नईविरुद्ध पहिल्या सामन्यात पराभव स्वीकारावा लागला आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत, दोन्ही संघ आपल्या पहिल्या विजयासाठी उत्सुक असणार आहे. म्हणूनच आजचा सामना मनोरंजक असेल. गुजरातचे कर्णधारपद शुभमन गिलकडे आहे. तर, मुंबईची कमान हार्दिक पांड्याकडे आहे.
हेड टू हेड रेकॉर्ड (MI vs GT Head to Head)
आयपीएलच्या इतिहासात गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात एकूण पाच सामने खेळले गेले आहेत. या काळात, गुजरात टायटन्सने वरचढ कामगिरी केली आहे. गुजरात टायटन्सने तीन सामने जिंकले आहेत. तर, मुंबई इंडियन्सने फक्त दोन सामने जिंकले आहेत. गेल्या हंगामात दोन्ही संघांमध्ये फक्त एकच सामना खेळला गेला होता आणि हा सामना गुजरात टायटन्सने सहा धावांनी जिंकला होता. मुंबई इंडियन्स यावेळी पुनरागमन करू इच्छितात.
GT विरुद्ध MI सामन्यासाठी सर्वोत्तम ड्रीम 11 संघ
जर आपण या सामन्यातील ड्रीम 11 संघाबद्दल बोललो तर तुम्ही तुमच्या संघात यष्टिरक्षक म्हणून 2 खेळाडूंचा समावेश करू शकता, यामध्ये जोस बटलर आणि रायन रिकेलटन यांची नावे आहेत. फलंदाजांबद्दल बोलायचे झाले तर, तुम्ही रोहित शर्मा, विल जॅक्स, शुभमन गिल आणि साई सुदर्शन या चार खेळाडूंमधून निवड करू शकता. या सामन्यात अष्टपैलू खेळाडूंची भूमिका खूप महत्त्वाची असणार आहे, त्यामुळे तुम्ही तुमच्या संघात हार्दिक पंड्या आणि मिशेल सँटनरचा समावेश करू शकता.
रोहित की बटलर कोणाला बनवणार कर्णधार?
गोलंदाजांच्या पर्यायात, ट्रेंट बोल्ट व्यतिरिक्त, तुम्ही तुमच्या संघात रशीद खान आणि आर साई किशोर यांची निवड करू शकता. तुम्ही तुमच्या संघाचा कर्णधार म्हणून रोहित शर्माची निवड करू शकता, ज्याच्या बॅटने पहिल्या सामन्यात चांगली कामगिरी केली नसेल पण या सामन्यात त्याची बॅटिंग पूर्ण जोमात दिसून येवू शकते, तर तुम्ही जोस बटलरला उपकर्णधार बनवू शकता, ज्याने या हंगामाची सुरुवात फलंदाजीने शानदार केली आहे.
गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स सामन्यासाठी सर्वोत्तम ड्रीम 11 संघ
रायन रिकेल्टन, जोस बटलर (उपकर्णधार), रोहित शर्मा (कर्णधार), विल जॅक्स, शुभमन गिल, साई सुदर्शन, हार्दिक पंड्या, मिशेल सँटनर, ट्रेंट बोल्ट, रशीद खान, आर. साई किशोर.
(The above story first appeared on LatestLY on Jan 01, 1970 05:30 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

