Women's Cricket World Cup 2022 : महिला क्रिकेट विश्वचषक 2022 आजपासून सुरु, Doodle बनवत Google ने दिल्या शुभेच्छा
Women's Cricket World Cup 2022 Google Doodle

आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक 2022 (ICC Women's Cricket World Cup 2022) आजपासून सुरु होत आहे. विश्वचषकाचे यंदा 12वे वर्ष आहे. आज सकाळी 6.30 वाजता विश्वचषक स्पर्धेला सुरुवात झाली. दरम्यान, Google ने सुद्धा आज ICC महिला क्रिकेट विश्वचषक 2022 च्या शुभारंभानिमित्त खास Doodle साकारले आहे. आजचे गुगूल डूडल (Google Doodle) हे महिला क्रिकेटला समर्पीत आहे. विश्वचषकातील पहिला सामना न्यूझीलंडमधील (Zealand) बे ओव्हल (Bay Oval Stadium) स्टेडियमवर सुरू झाला.

Google Doodle मध्ये आपण पाहू शकता सहा महिला खेळाडू क्रिकेट खेळत आहेत. या खेळाडूंच्या खेळाचा आनंद प्रेक्षक घेत असल्याचेही डूडलमध्ये पाहायला मिळते आहे. (हेही वाचा, वाचा: Dr. Kamal Ranadive Google Doodle: कमल राणादीव यांच्या 104 व्या जन्मदिनानिमित्त खास गूगल डूडल .)

तुम्ही गुगलच्या होमपेजवर जाऊन महिला क्रिकेट विश्वचषक शोधल्यास, तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला क्रिकेटचे चेंडू डावीकडून उजवीकडे सरकताना दिसतील. त्यांना पुन्हा पाहण्यासाठी, तुम्ही पृष्ठाच्या तळाशी असलेल्या कॉन्फेटी पॉपरवर क्लिक करू शकता.