आयसीसी क्रिकेट पुरुष विश्वचषक 2023 चा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात रंगला आहे. या सामन्याचा उत्साह संपूर्ण भारत आणि जगभरातील क्रिकेट चाहत्यांमध्ये पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे गूगलही या आनंदात सहभागी झाले (Google Doodle Celebrates 2023 ICC Men's Cricket World Cup Grand Finale) आहे. नेहमीप्रमाणे गूगलने आजही हटके डूडल साकारत या सामन्यात आनंदाचे रंग भरले आहेत. आपणही आजचे गूगल-डूडल येथे पाहू शकता. आयसीसी क्रिकेट विश्वचषक म्हणजे अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड, भारत, नेदरलँड, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका या दहा राष्ट्रांचा समावेश असलेल्या एका रोमांचक स्पर्धेच्या पराकाष्ठेचा प्रतीकात्मक उत्सव आहे.
Google डूडलची कलात्मकता:
आजचे Google डूडल या भारत ऑस्ट्रेलिया सामना आणि वर्ल्डकप सामन्याचे सार दर्शवते. ज्यामध्ये क्रिकेटच्या प्रतिष्ठित प्रतिमेला त्याच्या केंद्रस्थानी असलेल्या विश्वचषकाला आणि त्याच्या वैशिष्ट्याला एकत्रित संबधित करते. डूडलमध्य स्पर्धेच्या अंतिम फेरीपर्यंतचा प्रवास चिन्हांकित केला गेला आहे.
डूडलचे स्पष्टीकरण देताना, Google ने म्हटले, 'आजचे डूडल भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील 2023 ICC पुरुष क्रिकेट विश्वचषक साजरे करते! या वर्षी, भारताने अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड, भारत, नेदरलँड, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका या दहा राष्ट्रीय संघांचे यजमानपद भूषवले. ज्याचा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन देशांमध्ये पार पडतो आहे. अंतिम स्पर्धकांना शुभेच्छा!'
विश्वचषक सामन्यासाठी भारत आणि ऑस्ट्रेलियाचा संघ
भारतीय संघ: रोहित शर्मा (क), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, रविचंद्रन अश्विन, इशान किशन, प्रसिद्ध कृष्णा, सूर्यकुमार यादव.
ऑस्ट्रेलिया संघ: पॅट कमिन्स (क), स्टीव्ह स्मिथ, अॅलेक्स कॅरी, जोश इंग्लिस, सीन अॅबॉट, कॅमेरॉन ग्रीन, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, मार्नस लॅबुशेन, मिच मार्श, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, डेव्हिड वॉर्नर, अॅडम झाम्पा, मिचेल स्टार्क.
सर्वांचे लक्ष नरेंद्र मोदी स्टेडियमवर:
भारताने यजमानपद भूषवलेली ही स्पर्धा कळस गाठत असताना सर्वांचे लक्ष आता अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमकडे लागले आहे. येथे, भारत आणि ऑस्ट्रेलिया क्रिकेटमधील अंतिम बक्षीस मिळवण्यासाठी जोरदार लढाईसाठी सज्ज आहेत.