Glen Maxwell New Milestone In IPL: ग्लेन मॅक्सवेल आयपीएलच्या आगामी हंगामात करू शकतो कहर, 'या' खास विक्रमांवर असेल नजर
ग्लेन मॅक्सवेल (Photo Credit: PTI)

Glen Maxwell New Milestone In IPL: इंडियन प्रीमियर लीगच्या 17 व्या हंगामाची सुरुवात आज म्हणजेच 22 मार्च रोजी चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB vs CSK) यांच्यातील सामन्याने होणार आहे. हा सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर (MA Chidambaram Stadium, Chennai) होणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना रात्री 8 वाजल्यापासून घरी बसून प्रेक्षक लाईव्ह पाहू शकतात. त्याआधी, संध्याकाळी 6.30 वाजल्यापासून आयपीएलचा उद्घाटन सोहळा देखील होईल, ज्यामध्ये अनेक लोकप्रिय सेलिब्रिटी आपली प्रतिभा दाखवणार. पहिल्या टप्प्यात या मैदानावर फक्त 2 सामने खेळले जाणार आहेत, ज्यामध्ये उद्घाटन सामन्याव्यतिरिक्त, 26 मार्च रोजी सीएसके आणि गुजरात टायटन्स (CSK vs GT) यांच्यात सामना खेळवला जाईल.

ग्लेन मॅक्सवेल करु शकतो मोठा पराक्रम

आगामी हंगामात आरसीबी संघाला अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेलकडून उत्कृष्ट कामगिरीची अपेक्षा असेल. ग्लेन मॅक्सवेलमध्ये आपल्या खेळाने सामन्याची दिशा बदलण्याची क्षमता आहे. आक्रमक फलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेला ग्लेन मॅक्सवेलही उपयुक्त गोलंदाजी करतो. ग्लेन मॅक्सवेल आयपीएलच्या आगामी हंगामात काही विक्रम आपल्या नावावर करू शकतो. (हे देखील वाचा: Virat Kohli IPL Record: विराट कोहली आज इतिहास रचण्याच्या जवळ, अशी कामगिरी करणारा ठरेल तो पहिला भारतीय खेळाडू)

आयपीएलमध्ये 3 हजार धावा करणारा तिसरा ऑस्ट्रेलियन फलंदाज

आरसीबीचा घातक फलंदाज ग्लेन मॅक्सवेलने त्याच्या आयपीएल कारकिर्दीत आतापर्यंत 124 सामने खेळले आहेत. या कालावधीत, ग्लेन मॅक्सवेलने 26.39 च्या सरासरीने आणि 157.62 च्या स्ट्राइक रेटने 2,719 धावा केल्या आहेत. ग्लेन मॅक्सवेलच्या नावावर 18 अर्धशतके आहेत. ग्लेन मॅक्सवेल आयपीएलमध्ये आपल्या 3 हजार धावा पूर्ण करण्याच्या अगदी जवळ आहे. या जादुई आकड्याला स्पर्श करणारा ग्लेन मॅक्सवेल डेव्हिड वॉर्नर आणि शेन वॉटसन यांच्यानंतर केवळ तिसरा ऑस्ट्रेलियन फलंदाज बनू शकतो. ग्लेन मॅक्सवेलच्या आधी डेव्हिड वॉर्नर आणि शेन वॉटसन यांनी ही अनोखी कामगिरी केली होती.

ग्लेन मॅक्सवेल आरसीबीसाठी 1,500 धावा करू शकतो पूर्ण 

ग्लेन मॅक्सवेलने आरसीबीसाठी 42 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने 34.68 च्या सरासरीने आणि 161.43 च्या स्ट्राइक रेटने 1,214 धावा केल्या आहेत. दरम्यान, ग्लेन मॅक्सवेलनेही 12 अर्धशतके झळकावली आहेत. आगामी हंगामात ग्लेन मॅक्सवेल आरसीबीसाठी 1,500 धावा पूर्ण करू शकतो. आतापर्यंत फक्त विराट कोहली, एबी डिव्हिलियर्स आणि ख्रिस गेल यांनी आरसीबीसाठी 1,500 हून अधिक धावा केल्या आहेत.

ग्लेन मॅक्सवेल टी-20 क्रिकेटमध्ये 10 हजार धावा करु शकतो पूर्ण

ऑस्ट्रेलियाचा स्फोटक फलंदाज ग्लेन मॅक्सवेलने आपल्या टी-20 कारकिर्दीत 422 सामने खेळले आहेत. या कालावधीत, ग्लेन मॅक्सवेलने 28.13 च्या सरासरीने आणि 153.89 च्या स्ट्राइक रेटने 9,651 धावा केल्या आहेत. त्याचबरोबर ग्लेन मॅक्सवेलने 7 शतके आणि 52 अर्धशतकेही केली आहेत. ग्लेन मॅक्सवेलची टी-20 क्रिकेटमधील सर्वोच्च धावसंख्या नाबाद 154 आहे. ग्लेन मॅक्सवेल आयपीएलच्या आगामी हंगामात टी-20 क्रिकेटमध्ये त्याच्या 10,000 धावा पूर्ण करू शकतो. आतापर्यंत केवळ 13 फलंदाजांनी ही अनोखी कामगिरी केली आहे.