India Tour Of Australia 2020: टिम पेन च्या अटीवर विराट कोहली नव्हे तर गौतम गंभीर ने दिले उत्तर, 'बेबी-सीटिंग' ची आठवण करून देत केले 'हे' विधान
टिम पेन आणि गौतम गंभीर (Photo Credit: Getty/IANS)

भारतीय संघ पुढील वर्षी ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाणार आहे. नुकत्याच संपुष्टात आलेल्या बांग्लादेशविरुद्ध दुसरा टेस्ट सामना (गुलाबी बॉल) जिंकल्यावर ऑस्ट्रेलियाचा टेस्ट कर्णधार टिम पेन (Tim Paine) याने विराट कोहली (Virat Kohli) याच्यासमोर एक खास अट ठेवली. पाकिस्तान (Pakistan) विरुद्ध झालेल्या पहिल्या टेस्टनंतर पेनने पत्रकारपरिषदेत पेनने म्हटले की, पुढच्या वर्षी भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा ब्रिस्बेनमध्ये डे-नाईट कसोटी सामन्याने सुरू करायचा आहे. पेनच्या या ऑफरवर विराटने अजून कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही आहे, पण टीम इंडियाचा माजी सलामी फलंदाज गौतम गंभीर (Gautam Gambhir) याने पेनला रात्री उशिरापर्यंत 'बेबी सीटिंगची व्यवस्था' सुरू करण्यास सांगितले आहे. पेनने कोहलीला ब्रिस्बेन (Brisbane) मध्ये मालिकेची सुरुवात करण्याची ऑफर या कारणाने दिली कारण ऑस्ट्रेलियन संघाला ब्रिस्बेनच्या गाबा मैदानाची खेळपट्टी सूट होते. 1931 पासून, या मैदानावर कांगारूं संघाने 62 पैकी केवळ 8 कसोटी सामने गमावले आहेत. (India Tour Of Australia 2020: टिम पेन ने गब्बामध्ये टेस्ट खेळल्याचे विराट कोहली ला दिले आव्हान, पाहा व्हिडिओ)

टाइम्स ऑफ इंडियाला लिहिलेल्या त्यांच्या कॉलममध्ये गंभीरने लिहिले की, “पेनने कोहलीला ज्या प्रकारे आव्हान दिले ते मला आवडले. डाउन अंडर मधील पहिल्या सामन्यात आपण डे-नाईट टेस्ट सामना खेळू शकता हे अगदी आव्हानात्मक आणि बघण्यासारखे असेल. कसोटी क्रिकेटच्या मार्केटिंगसाठी हे एक चांगले पाऊल असेल. ऑस्ट्रेलिया विरुद्ध ब्रिस्बेनमध्ये भारतविरुद्ध डे-नाईट कसोटी सामन्याशिवाय आणखी कशाची आवश्यकता आहे? पेनच्या प्रश्नाचे उत्तर अद्याप कोहलीने दिले नाही, परंतु मी तर नक्की म्हणेन की तुम्ही रात्रीपर्यंत बेबीसिटींगची व्यवस्था करण्यास तयार आहात !!!"

भारत आणि बांग्लादेश क्रिकेट संघात कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर पहिला डे-नाईट कसोटी सामना खेळला गेला. हा सामना टीम इंडियाने डाव आणि 46 धावांनी जिंकला आणि बांग्लादेशचा 2 सामन्यांच्या मालिकेत क्लीन-स्वीप केला.